कोरोना विषाणु हद्दपार करण्याच्या लढयात, एक हात मदतीचा
कन्हान : – कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भावावर प्रतिबंधत्मांक उपाय म्हणुन २१ दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये विविध समस्या निवारण्याकरिता सेवाभावी संस्था व समाजसेवका व्दारे एक हात मदतीचा म्हणुन नागरिकांची होईल त्या पध्दतीने मदत करण्यात येत आहे.
कान्द्री-कन्हान टोल नाका येथे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश कडे अमरावती, वर्धा, नागपुर वरून पायदळ, वाहनाने स्वगृही परत जाणा-या मजुर व त्याच्या परिवारा ना भोजनाची व्यवस्था करून त्याना स्वच्छ हाथ धुणे, पाणी पिने, हैंडवॉश, सैनिटाइजर चा उपयोग, एक दुस-यात अंतर ठेवणे यावर प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली. यात पायदळ मजुर परिवाराना त्यांच्या गावाकडिल वाहनात किंवा मध्य प्रदेश सिमा नाका पर्यत पोहचन्यास मदत करण्यात आली.
हे सेवाभावी कार्य सतत तीन दिवसापासुन आऔ साई मित्र मंडळ, टोल नाका कर्म चारी, ग्रामिण पत्रकार संघ कन्हान भुमि पुत्र बहुउद्देशीय संस्था कांद्री, वाकलपुडी फाऊंडेश चांपा व्दारे सहकार्य देत असुन याप्रसंगी प्रेमदास धरमारे, दिलीप बावने, अतुल हजारे, राजेश पोटभरे, मोतीराम रहाटे, शांताराम जळते, सुनिल सरोदे, गणेश खोब्रागडे, सौरभ यादव, गौरव भोयर, सौरभ पोटभरे, इंजि.शिवाकृष्ण वाकलपुडी, इंजि.राहुल बागड़े, रवि पहाडे, राजु पाटील, सुब्रह्मण्यम वाकल पुडी, रोबिन फ्रांसिस, सुमित यादव, निखिल रामटेके, अक्षय इरपाते, साई वीरेंद्र वाकलपुडी आदीसह समाज सेवक सेवा प्रदान करित आहे.
गरजुना निलेश गि-हे धान्य दान
कांद्री येथील निलेश रमेश गिरे यांचे व्दारे जिवनाश्यक तांदूळ, तिखट मीठ, तेल, डाळ, कांदा, बटाटा, मिरची या अन्नधान्याची वस्तु गरजुना देऊन सेवा करण्यात आली. आपले कर्तव्य म्हणुन आपण गरजु लोकांना एक जीवनावश्यक वस्तू ची एक किट तयार करून सेवा करावी असे आवाहन केले.
कांग्रेस कमेटी महिला आघाडी व़्दारे अन्नधान्य वितरण
कन्हान कॉग्रेस कमेटी महिला आघाडी अध्यक्षा सौ. रिताताई नरेशजी बर्वे व्दारे शहरातील हातमजुर गरजु लोकांना उपासमारीची समस्या पाहता कन्हान येथील शिवाजी नगर, धरमनगर, सत्रापुर, पिपरी, वाघधरे वाडी, एम जी नगर येथे गरजुना अन्नधान्य सामुग्री, मॉस्क चे वितरण करण्यात आले. तसेच मध्य प्रदेश व ईतर राज्यात पायदळ स्वगृही जाणा-या मजुरांना मदत करण्या चे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी नरेश बर्वे, कन्हान नगरपरिषद उपाध्यक्ष योगेश रंगारी, गटनेता मनिष भिवगडे, गटनेता सौ. मोनिकाताई पौनिकर, नगर सेविका गुंफाताई तिडके, नगरसेवक विनय यादव, अनिल ठाकरे समाजसेवक अमोल प्रसाद, प्रशांत मसार, प्रदिप बावणे प्रामुख्याने उपस्थित राहुन सेवा दिली.
कन्हान शहर विकास मंच
नागपुर कडुन मध्य प्रदेश स्वगृही पायदळ, दुचाकी, सायकल ने जाणा-या हात मजुर व कुटुंबाना कन्हान शहर विकास मंच व्दारे गांधी चौक, तारसा रोड चौक येथे जेवण, पिण्याच्या पाण्या ची व्यवस्था करून सेवा प्रदान करण्यात आली. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव अभिजीत चांदुरकर, नितिन मेश्राम, महेश शेंडे, सोनु मसराम, मंगेश शंभरकर, प्रवीण माने, सोनु खोब्रागडे, महेश धोंगडे, नितीन मेश्राम मंच पदाधिकारी, सदस्य सतत सेवा करित आहे.
कोरोना विषाणु हद्दपार करण्याच्या लढयात, एक हात मदतीचा
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39uwYAq
via
No comments