Breaking News

NHAI-मनपाचे आंतरजोडणीच्या कामासाठी २४ तासांचे शटडाऊन ३० जानेवारी रोजी

Nagpur Today : Nagpur News

लकडगंज झोनमधील पारडी १, पारडी २ आणि भांडेवाडी जलकुंभांचा पाणीपुरवठा सोमवारी राहणार बाधित

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी मानेवाडा चौक येथे नवीन ५०० मिमी व्यासाच्या वाहिनीची आंतरजोडणी जुन्या ५००मिमी व्यासाच्या वाहिनीशी करण्यासाठी २४ तासांच्या शटडाऊनची विनंती केली आहे. NHAI राष्ट्रीय महामार्ग ६ वर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याचे काम करत आहे. याचाच भाग म्हणून ‘युटीलिटी शिफ्टिंग’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या याकामाला २४ तासांचा अवधी लागेल. हे काम ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता वाठोडा -मानेवाडा चौक रिंग रोड वरील नाग नदीजवळ सुरु होईल.

या २४ तास शटडाऊन दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
पारडी-१ जलकुंभ: महाजनपुरा, खाटिकपुरा, मातंगपुरा, डबलेवाडी, उडिया मोहल्ला, गजानन मंदिर परिसर, ठवकरवाडी, अंबे नगर, समता नगर, एकता नगर, दुर्गा नगर, सराई मोहल्ला, हनुमान मंदिर, सद्गुरू नगर, विनोबा भावे नगर, कोष्टीपुरा, राणीसती लेआऊट, जय दुर्गा नगर, रामभूमी १, रामभूमी २, सुंदर नगर, शेंडे नगर, दीप नगर, ई.

पारडी-२ जलकुंभ: तालपुरा, शारदा नगर, भवानी मंदिर, गणेश मंदिर परिसर, राम मंदिर परिसर, घटाटे नगर, अशोक नगर, रेणुका नगर, गंगाबाग, नवीन नगर, श्याम नगर, आभा नगर, भरतवाडा गाव, करारे नगर, पुनापूर गाव, शिवशक्ती नगर, ई.

भांडेवाडी जलकुंभ: राज नगर, बालाजी किराणा, वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर, सरजू टाऊन, खांदवानी टाऊन, पवनशक्ती नगर, अन्तुजी नगर, तुलसी नगर, अब्बुमिया नगर, महेश नगर, मेहेर नगर, सरोदे नगर, साहिल नगर, ई.

शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

For any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.

NHAI-मनपाचे आंतरजोडणीच्या कामासाठी २४ तासांचे शटडाऊन ३० जानेवारी रोजी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/39o6ljO
via

No comments