Breaking News

CCTV: नागपुरात मध्यरात्री कार पेटवली, ८ वाहनांची केली तोडफोड

Nagpur Today : Nagpur News

नागपूर: नागपपुरातील नरेंद्र नगर परिसरात बुधवारी मध्यरात्री तीन तरुणांनी कार पेटवली. तसेच आठ वाहनांची तोडफोड केली. नागपुरात गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.

नरेंद्र नगर परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांनी रस्त्यालगत पार्क केलेली कार पेटवून दिली. तसेच आठ अन्य वाहनांची तोडफोड केली. नरेंद्र नगर परिसरातील लक्षवेध मैदानाजवळ रस्त्यालगत कार उभी करण्यात आली होती. ती या तरुणांनी पेटवून दिली. तर याच परिसरात विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या आठ गाड्या फोडण्यात आल्या.

या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नरेंद्र नगरातील अशोक अपार्टमेंट येथील सीसीटीव्हीच्या फुटेजच्या मदतीने या घटनेचा तपास केला जात आहे. कार पेटवून देणारी तिन्ही मुले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तिघे जण दुचाकीवरून आले. त्यातील एका तरुणाने कार पेटवून दिल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसून येते. या तरुणांनी एका वाहनातील पेट्रोलही चोरले. नागपुरात गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे वाहन मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

CCTV: नागपुरात मध्यरात्री कार पेटवली, ८ वाहनांची केली तोडफोड



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3kHdT4c
via

No comments