कोळसा चोराकडून रेल्वेच्या पेड्राल क्लिप जप्त
– सराईत कोळसा चोरास अटक, इतवारी आरपीएफ पथकाची कारवाई
नागपूर– रेल्वेच्या साईqडगवरून कोळसा चोरणाèया सराईत चोरास इतवारी आरपीएफच्या पथकाने पकडले. अजय राजगीरे (४०) असे अटकेतील कोळसा चोराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून २०० किलो कोळसा आणि दोन रेल्वे रूळाच्या पेड्राल क्लिप जप्त करण्यात आले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत कन्हान जवळ डुंबरी रेल्वे सायqडग आहे. अजय या सायqडगवरून नेहमीच कोळसा चोरी करून त्याची विक्री करायचा. या घटनेची गुप्त माहिती इतवारी आरपीएफला मिळाली. त्याला रंगेहात अटक करण्यासाठी पथकाने अजयची संपूर्ण माहिती गोळा केली. इतवारी आरपीएफ ठाण्याचे निरीक्षक आर. के. qसह, एपीआय मोहम्मद मुगीसुद्दीन, ओ.एस. चौहान, ईशांत दीक्षित यांनी डुंबरीच्या रेलवे साइडिंग पर सापळा रचला. बèयाच वेळानंतर एक व्यक्त विना नंबरच्या दुचाकीने कोळसा भरलेले चार पोते घेवून जाताना दिसला. पथकातील जवानांनी काही अंतरापर्यंत पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.
झडती दरम्यान त्याच्या जवळ कोळसा, दोन लोखंडी पेड्राल क्लिप मिळून आले. पथकाने त्याची चौकशी केली असता तो म्हणाला डूबरी सायडिंगवरून कोळशाचे सॅम्पल गोळा करतो. परंतु या कामासाठी रेल्वेकडून परवागी लागते.
रेल्वेचा परवानाधारकच हे काम करू शकतो. मात्र, त्यावर अजय समाधान कारक उत्तर देवू शकला नाही. आरपीएफच्या पथकाने त्याच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली. त्याच्या ताब्यातून २०० किलो कोळसा, दोन पेड्राल क्लिप आणि दुचाकी वाहन असा एकून २५ हजार रुपये qकमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुत पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
कोळसा चोराकडून रेल्वेच्या पेड्राल क्लिप जप्त
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3nYPFDk
via
No comments