प्रजासत्ताकदिनानिमित्त युवकांचा ४० किलोमीटर धावून शारीरिक सक्षमतेचा संदेश
नागपूर : प्रजासत्ताकदिनाचा राष्ट्रीय उत्सव प्रत्येक भारतीय आपापल्यापरीने साजरा करीत असतो. तसेच अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम व उपक्रमांचेही आयोजन केले जाते. मात्र, नागपुरातील युवकांनी स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ नागपूर ते उमरेड अशी ४० किलोमीटर दौड पूर्ण केली व व शारीरिक सक्षमतेचा संदेश दिला.
विक्रम नेवारे, अक्षय वानखेडे, मनीष नेवारे, गणेश शिवणकर, रोहित पटेल अशी या युवकांची नावे आहेत. ते फिट क्रॉस इंडिया गु्रपच्या माध्यमातून राष्ट्रीय सणानिमित्त नियमित सामाजिक उपक्रम राबवितात.
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी युवावर्ग शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. आजच्या पिढीमध्ये देशभक्तीच्या महत्त्वासह शारीरिक सुदृढतेबाबत जनजागृती व्हावी, या हेतूने त्यांनी प्रजासत्ताकदिनाला ही दौड पूर्ण केली. दरम्यान, धावण्याच्या मार्गातील अनेक गावांतील नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढविला व प्रोत्साहन दिले.
प्रजासत्ताकदिनानिमित्त युवकांचा ४० किलोमीटर धावून शारीरिक सक्षमतेचा संदेश
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3iSoZDx
via
No comments