नॉन मेट्रो परिसर मध्ये मेट्रोची कनेटिव्हिटी
– म्हाळगी नगर,जयताळा, हिंगणा, ईसासणी परिसर नागपूर महानगर पालिकेची आपली बस फिडर सर्विसच्या स्वरूपात मेट्रो स्टेशनशी जुळले
नागपूर – नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा व जवळपासच्या परिसरात जाण्याकरिता फिडर सर्विसच्या रूपात आपली बस सेवा सुरु असून या सेवामध्ये आणखी वाढ करत म्हाळगी नगर,जयताळा,हिंगणा,ईसासणी परिसर देखील आता मेट्रो स्टेशन नागपूर महानगर पालिकेची आपली बस फिडर सर्विसशी जुळले आहेत.ज्यामुळे प्रवाश्याना याचा मोठ्या प्रमाणात फायदा व प्रवास करने सोईस्कर होईल.
Bold
प्रवाश्यानी अश्या प्रकारे करावा मेट्रो ट्रेन व आपली बसने प्रवास
१. म्हाळगी नगर ते जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन :(ज्यामध्ये संजय गांधी नगर,उदय नगर ,तपस्या नगर, मानेवाडा वस्ती,ओंकार नगर, रामेश्वरी,सुयोग नगर,नरेंद्र नगर,नरेंद्र नगर पश्चिम,पंचदीप नगर आणि जय प्रकाश नगर)
२. जयताळा ते जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन : (ज्यामध्ये पांडे लेआऊट,जय प्रकाश नगर,कोतवाल नगर,खामला,सहकार नगर,टेलिकॉम नगर,अग्ने लेआऊट,स्वालंबी नगर,ढोमणे सभागृह,दीनदयाल नगर,पूर्व स्वालंबी नगर,उमाटे कॉलेज,इंद्रप्रस्थ नगर, नासुप्र संकुल,पूर्व व पश्चिम सुर्वे नगर, प्रसाद नगर,अष्टविनायक नगर, जयताळा)
३. हिंगणा ते ईसासणी;लोकमान्य नगर स्टेशन मार्गे : (ज्यामध्ये हिंगणा हॉस्पिटल,हिंगणा गाव,हिंगणा सिटी,रायपूर,जिनिंग प्रेस, महाजन वाडी गांव,वानाडोंगरी,वायसीसीसी,राजीव नगर,इलेक्ट्रिक झोन एमआयडीसी,आयसी फॅक्ट्री एम आय डी सी परिसर,व्हीआयपी फॅक्टरी,लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन,रायसोनी कॉलेज,लता मंगेशकर हॉस्पिटल,सीआरपीएफ कॅम्प, पंचशील नगर, राय टाऊन, ईसासणी वस्ती)
४. बुटीबोरी ते खापरी मेट्रो स्टेशन :(ज्यामध्ये खापरी मेट्रो स्टेशन, खापरी गांव,परसोडी,गवसी मानापूर,सहारा सिटी,जामठा गांव फाटा शूअर टेक हॉस्पिटल,अशोकवन गांव,डोंगर गांव,वाकेश्वर,बोथली गांव,मोहगांव,जिंगिंग प्रेस,बुटीबोरी)
५. खापरी मेट्रो स्टेशन ते एम्स हॉस्पिटल :(ज्यामध्ये आर. के. मदानी कॉलोनी,बुटीबोरी एमआयडीसी गेट बस स्टॉप,ब्लूम डेल कॉलोनी,दिल्ली पब्लिक स्कुल,मिहान,एम्स हॉस्पिटल)
या ठिकाणी देखील बस प्रवाश्याकरिता सकाळ ते संध्याकाळ पर्यंत उपलब्ध असेल व प्रवाश्याना मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचणे शक्य होईल.
नॉन मेट्रो परिसर मध्ये मेट्रोची कनेटिव्हिटी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2X4IbUC
via
No comments