Breaking News

पेंचच्या २३०० एमएम पाईप लाईनची तात्काळ दुरूस्ती करा

Nagpur Today : Nagpur News

स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केली पाहणी

नागपूर : शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या पेंचच्या २३०० एमएम पाईप लाईनला गळती सुरु झाल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे. त्याचा प्रभाव नागपूर शहरातील पाणीपुरवठ्यावर होतो. त्यामुळे पेंचच्या २३ एमएम पाईप लाईनची तात्काळ दुरूस्ती करा, असे निर्देश मनपाचे स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

गुरूवारी (ता. ३१) स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी पेंच येथून पुरवठा होत असलेल्या २७ किमीच्या पाईप लाईनची पाहणी केली. यावेळी जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, माजी उपमहापौर तथा नगरसेवक दीपराज पार्डीकर, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, कनिष्ठ अभियंता श्री.भस्मे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी/ कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापतींनी केलेल्या पाहणीमध्ये चार ठिकाणी गळती असल्याचे आढळून आले. २७ किलोमीटरच्या संपूर्ण क्षेत्रात पारशिवनी, इटगाव, करमभाड या भागामध्ये चार ठिकाणी गळती निदर्शनास आली. यापैकी इटगाव येथे मोठे लिकेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे शहरातील पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी व पाण्याची गळती बंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असेही निर्देश स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली.

उन्हाळ्यामध्ये शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत पाण्याची अशा प्रकारे गळती होणे हे अत्यंत धोकादायक स्थिती ठरणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी संकट लक्षात घेउन कुठल्याही प्रकारे पाणी गळती होउ नये, याची कटाक्षाने काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी संबंधित अधिका-यांना यावेळी दिले.

याशिवाय बिना (संगम) जवळील कोलार नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधा-यामुळेही पुढे पाण्याचा प्रवाह बाधित होत असल्याचे पाहणी दौ-यामध्ये निदर्शनास आले. नदीचा प्रवाह मोकळा होउन पाण्याचा सुरूळीत पुरवठा व्हावा, यादृष्टीनेही आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

पेंचच्या २३०० एमएम पाईप लाईनची तात्काळ दुरूस्ती करा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3hxTluv
via

No comments