Breaking News

नागपूर जिल्ह्यातील मानस अ‍ॅग्रो प्रा.लि. या साखर कारखान्यात ब्लास्ट; वेल्डरसह पाच कामगारांचा मृत्यू

Nagpur Today : Nagpur News

नागपूर: जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अ‍ॅग्रो प्रा.लि. साखर कारखान्यात बायोगॅसच्या टँकवरील भागात ब्लास्ट झाल्याने तिथे काम करित असलेल्या वेल्डरसह पाच कामगारांचा (हेल्पर) घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मानस अ‍ॅग्रो प्रा.लि.येथे बायोगॅसचा टँक असलेल्या परिसरात वेल्डींगचे काम सुरु असताना अचानक ब्लास्ट झाला. यात मंगेश प्रभाकर नवकरकर (२३), वासुदेव विठ्ठल लडी (२७), सचिन वाघमारे (२७), प्रफुल मुन (२५), लीलाधर शेंडे (४०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच बेला पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. ब्लास्ट कशामुळे झाला, या कारणाचा शोध घेतला जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील मानस अ‍ॅग्रो प्रा.लि. या साखर कारखान्यात ब्लास्ट; वेल्डरसह पाच कामगारांचा मृत्यू

from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3k1000O
via

No comments