शुद्ध पाण्यासाठी “जवाहर नगर “वासियांची १७ वर्षापासून पायपीट
कन्हान नगर परिषद येथील प्रभाग क्रमांक ४चार मधला एकदम कमी लोकसंख्या व क्षेत्रफळ असलेल्या वसाहत म्हणून जवाहरनगर प्रसिद्ध आहे .कारण निवडणुकीमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान व महत्त्वाची सक्रिय भूमिका निभावणारा निर्णायक ठरतो तो जवाहरनगर. या नगरातूनच मागील कित्येक वर्षापासून ग्रांमपंचायचे अनेक सरपंच, उपसरपंच ,तसेच न.प चे अध्यक्ष सुद्धा निवडून आलेले आहे .परंतु या जवाहरनगर दशा व दिशा बदललेली नाही . दुर्देवी ईथे कसल्याही प्रकारची सुधारणा झालेला नाही .या नगरात विकास मात्र दूरच .
मागील 17 वर्षापासून या नगरातील लोक शुद्ध पाण्यासाठी ग्रामपंचायत नगर परिषद च्या प्रवास आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे .अनेक बदल होऊन सुद्धा या नगरला शुद्ध पाणी पिण्या योग्य लाभलेला नाही. जीवनावश्यक व नागरिक सुविधा म्हणून पिण्याचे पाणी साठी त्यांनी अनेकदा शासनाला, ग्रामपंचायतीमधील सरपंच, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, पर्यंत व तसेच प्रशासक व मुख्यअधिकारी यांना एकूण बारा १२ निवेदन देण्यात आले ,तसेच कित्येकदा तरी नगरसेवकांना व पाणिपुरवठा विभागात मौखिक व वैयक्तिक तक्रार सुद्धा देण्यात आल्या .अनेकदा या नगरातील लोकांनी शूध्द पिण्याच्या पाण्यासाठी विविध आंदोलने ,मोर्चे, केलीत किंतु नेत्यांचे खोटे आश्वासन देऊन टँकर द्वारे पाणी पुरवठा करून नेत्यानी आपले खिसे भरलेत.
शुद्ध पाणी देण्यास हे ग्रामपंचायत ते आताची नगरपरिषद असमर्थ ठरले आहेत.मागच्या माजी नगराध्यक्षांनी ,उपाध्यक्ष व नगरसेवकांनी 2017~ 18 मध्ये शुद्ध पाणी नक्की मिळेल असा विश्वास दिला होता ,पण ते ही फसविच .नगरवासी मात्र हातावर हात ठेऊन ही मागणी किती वर्ष प्रलंबित राहणार हे बघत आहे. मागिल न.प मध्ये असलेली बि.जे.पी सरकारनी कित्येकदा तरी या पाण्याचा समस्या साठी बैठके व सभा घेण्यात आल्या किंतु समस्या काही सुटेली नाही.
या वर्षी नगर परिषद मध्ये 19~ 20 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सेनेच्या महिला अध्यक्षा करूणा ताई आष्टणकर हे मोट्या अंतराने निवडून विजयी झाल्या, जवाहर नगर ही त्यांची सासुरवाडी आहे व ते या जवाहर नगरात राहल्या सुध्दा, लोकांना वाटलं की या नगराची कायापालट होणार पण निकाल मात्र “जैसे थे वैसे ही” अशुद्ध पाणी पुरवठाची स्थिती तीच .
या उन्हाळ्यामधे कमी पाणीपुरवठा ऊलट कमी वेळ नळ येतो, या नगराची दुर्दशा अशी की या नगरात दोन पाइपलाइन आहेत काही घरांना नवीन पाईप मधुन पाणि पुरवठा होते व काही घरांना जुना पाईप लाईन मधुन पाणी पुरवठा होतो किंतु शरमेची बाब दोन्ही पाइपलाइनमधून मधून दूषित व अशुद्ध पाणी मिळते .विशेष म्हणजे जुनी पाईपलाईन ही मध्येच खंडित व ब्लॉक झालेली आहे ही समस्या सुद्धा गंभीर आहेच.
या समस्येकडे मुख्याधिकारीनी सुद्धा पाठ फिरवलेली आहे . अशातच अशुद्ध पाणीपुरवठा असल्यामुळे या नगरातील नागरिकांना विविध रोगांनी ग्रासलेले आहे लोकांना गॅस, अपचन,एसीडीटी, अस्थीरोग, हार्ट/ हृदय च्या अस अनेक समस्या जास्त लोकिकांन मध्ये ऊद्भवत आहेत. नगर प्रशासन मात्र झोपलेला. सतरा१७ वर्षांपासून त्यांची कुठेही सुनवाई झालेली नाही. काही दिवसापासुन ईतक्यात तर पाणी खुप जास्तच अशुद्ध येत आहे की पाणि फक्त भांडी धुणे व संडास च्या उपयोग साठी करू शकतो असे आले, पण पिण्यायोग्य आलेल्या नाही ,हीच इथली शोकांतिका .
वर्षातून 365 दिवसांपैकी मात्र 170 दिवस पाणी मिळतो तेही अशुद्ध व पिण्यास योग्य नाही मात्र नगर परिषद नळ टॅक्स पाणीपट्टी टॅक्स पूर्ण एका वर्षाच्या घेते तेही मोठ्या इमान इतबारी नी वसूल करते. खूप वर्षे झालीत या समस्याला आता लोकांची आवाज सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आले होते.आता लोकं थकलेत मात्र नगर प्रशासन कुंभकरणिय झोपेतच.
ऊन्हाळ्याच्या तीन३ महिन्यापासून इथले काही नागरिक आरो फिल्टर प्लांट च्या (डबक्या)कॅन RO Filter can मागवत आहेत तेही पैसे मोजून.लोकांनी टॅक्स पण द्यायचा आणि कॅन पण मागवायचं हा कुठला न्याय नगरपरिषदेचा आहे याचे उत्तर त्यांनी मुख्याधिकारी यांनी द्यावे अन्यथा जवाहर नगरातील नागरिकांचे नळ टँक्स माफ करण्यात यावे.
या नगरातील आई~ बहिणी व काही पुरूष मंडळी पहाटे सकाळी सहा६ ते सात७ वाजता रस्ता पार करून दुसऱ्या नगरातील नळातून शुद्ध पाणी आणण्याचे काम रोज करतात. मग या नगरातील नळ कनेक्शन कशासाठी दिले आहेत हे नगरपरिषदेने सांगावे .जर का पाणी भरताना रस्ता ~पार करतांनी काही अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी नगर प्रशासन व मुख्य अधिकारी यांची राहील .
या अशुध्द हिरवे~पिवळे पाण्याच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येणाऱ्या काळात जवाहर नगर मध्ये शुद्ध पाणी पिण्यायोग्य पाणी मिळाले नाही तर इथली जनता व नागरिक आंदोलन किंवा आमरण अंशन करण्याची भूमिका घेत आहेत .प्रशासना ने याकडे जातीने लक्ष देत अशुद्ध व दुषित पाण्यामुळे काही अप्रिय घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी अध्यक्षा, पाणी पुरवठा विभाग ,पाणीपुरवठा सभापती, तसेच मुख्य अधिकारी, यांची राहील असे निवेदन देण्यात आले .
या पाण्याच्या समस्या वर उपाय योजना व सुझाव म्हणून जवाहर नगरातील जुनी पाईपलाईन एसी रेल्वे लाईन्स ला जोडून देण्यात यावे जेणेकरून या नगरातील लोकांना शुद्ध पाणी पिण्यायोग्य मिळू शकेल अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आली.* निवेदन देताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पाणीपुरवठा सभापती यांना निवेदन देण्यात आले निवेदन देण्या प्रसंगी श्री.सतीश भसारकर ,शैलेश दिवे ,मयूर माटे, राजकुमार चांहांदे, विक्की उके, पायस मेश्राम ,सागर ऊके, अनिल रामटेके ,गौतम नितनवरे, अजय गणेर, राहुल चांदुरकर, कैलास गेडाम, योगेश नितनवरे ,उमराव पाटील, मनीष पाली ,मधुकरजी गणवीर ,शंकर माहुरे, निशांत मोटघरे व सतीश पाली व इतर नगरवासी नगरपरिषद मध्ये नावेदन देतांनी हाजीर होते.
शुद्ध पाण्यासाठी “जवाहर नगर “वासियांची १७ वर्षापासून पायपीट
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2BjgNut
via
No comments