महा मेट्रोचे नागपूर शहराकरिता कार्य गौरवपूर्ण : महापौर
– शहराच्या विकासकामांवर महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याशी विस्तृत चर्चा
नागपूर – आज नागपूर शहराचे प्रथम नागरिक महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी महा मेट्रोचे प्रशासकीय कार्यालय असलेले – मेट्रो भवनला सदिच्छा भेट दिली. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांच्याशी महा मेट्रो आणि नागपूर महानगर पालिका तर्फे संयुक्त पणे राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसंबंधी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यकारी संचालक श्री. अनिल कोकाटे यांनी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे विस्तृत सादरीकरण केले.
चर्चे दरम्यान श्री. दयाशंकर तिवारी यांनी सांगितले कि, महा मेट्रोच्या वतीने नागपूर शहराकरिता गौरवपूर्ण कार्य केल्या जात आहे. नागपूर मेट्रोचे निर्माण कार्य जेव्हा सुरु झाले त्यावेळी कोण्ही विचार केला नव्हता कि, इतक्या कमी वेळात नागपूर शहरामध्ये मेट्रो नागरिकांन करिता उपलब्ध होऊ शकेल. मेट्रो सेवेचा उपयोग नागरिक करीत असून जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रोचा वापर करायला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी नागरिकांना केले. मनपा प्रमुख व महा मेट्रो प्रमुख मिळून शहराचे विकास कार्य करू असे उद्दगार महापौर यांनी व्यक्त केले. मी कालच महा मेट्रोचे महा कार्ड घेतले असून इतर नागरिकांनी देखील याचा उपयोग करून मेट्रोने प्रवास करावा असे मत महापौर श्री. दयाशंकर तिवारी त्यांनी यांनी व्यक्त केले. याव्यतिरिक्त सायकल ट्रॅकची उभारणी,मल्टी मोडेल इंट्रीग्रेशन,लास्ट माईल कनेक्टिव्हिटी,फिडर सर्विस व इतर विषयांवर विस्तुत चर्चा करण्यात आली.
२०२१ नागपूर शहराकरिता महत्वपूर्ण – डॉ. ब्रिजेश दीक्षित महा मेट्रो व नागपूर महानगरपालिका विविध प्रकल्पावर सोबत कार्य करीत आहे. महा मेट्रोच्या वतीने मेट्रो रेल प्रकल्पाव्यतिरिक्त इतर महत्वपूर्ण कार्य देखील करीत आहे. २०२१ महा मेट्रो व नागपूर शहराकरिता महत्वपूर्ण ठरणार असून रिच – २ (सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटिव्ह चौक) व रिच – ४ (सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर) चे निर्माण कार्य या वर्षी पूर्ण होणार आहे. सूचिबद्ध व समयबद्ध पद्धतीने कुठलेही निर्माण कार्य सहजपणे पूर्ण होऊ शकते. नागपूर शहर व नागरिकांना नवीन सुविधा व नवीन उंची प्राप्त व्हावी शहराला नवीन ओळख प्राप्त व्हावी असे कार्य मनपा आणि महा मेट्रोच्या वतीने केल्या जात आहे असे विचार महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले.
यावेळी संचालक (प्रकल्प)श्री.महेश कुमार, संचालक (वित्त) श्री.एस.शिवमाथण तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
महा मेट्रोचे नागपूर शहराकरिता कार्य गौरवपूर्ण : महापौर
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3shzmVM
via
No comments