रविवारी झोन कार्यालयांमधील बिलिंग काउंटर्स राहणार सुरु…
२१ जाने २०२१ पर्यंत पाणीबिलावरील विलंब शुल्क पूर्णपणे माफ ..
नागपूर:- आतापर्यंत १८९८२ हून अधिक नागरिकांनी नागपूर महानगरपालिकेद्वारे राबवण्यात येत असलेल्या अभय योजनेचा लाभ घेतलेला आहे व रु.६.८३ कोटीहून अधिक रक्कम मनपाच्या खात्यात जमा झालेली आहे (१५ जानेवारी २०२१ पर्यंत). अनेक वर्षांत देयक न भरल्याने अनेक ग्राहकांची विलंब शुल्काची रक्कम मुद्दलाच्या रकमेहून अधिक झालेली आहे. त्यामुळे अभय योजनेंतर्गत विलंब शुल्क १००% माफ झाल्याने थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळत आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेने १० झोनमध्ये जवळजवळ २२ बिलिंग काउंटर्स सुरु केले आहेत. आठवड्यातील सर्व कामाच्या दिवशी हे काउंटर्स सकाळी ८ ते ४ किंवा काही ठिकाणी सकाळी ८ ते ५ सुरु असतात. नागपूर महानगरपालिकेने आता नागरिकांच्या सुविधेसाठी हे काउंटर्स रविवारीदेखील सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून थकबाकीदर आता रविवारी देखील झोन कार्यालयांमधील बिलिंग काउंटर्सवर आपली थकीत रक्कम भरू शकतात.
यासोबतच थकबाकीदर पेटीएमद्वारेही आपली थकीत रक्कम भरू शकतात. इतर ऑनलाईन पर्याय थकबाकीदारांसाठी उपलब्ध नाही.
नागपूर महानगरपालिका पाणीबिलाच्या थकबाकीदारांसाठी सुवर्णसंधी घेऊन आलेली आहे. या अंतर्गत २१ डिसेंबर ते २१ जानेवारी २०२० दरम्यान पाणीबिलावरील विलंब शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. तर २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान विलंब शुल्कावर ७०% सूट देण्यात येईल.
नागपूर महानगरपालिकेतर्फे थकबाकीदारांना या योजनेची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आलेली आहेत. तसेच SMSद्वारेही याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. याशिवाय मोठ्या थकबाकीदारांना प्रत्यक्षपणे भेटूनही थकीत रक्कम भरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
नागपूर महानगरपालिका जलप्रदाय विभागाचे सद्यस्थितीत ३.७२ लाख ग्राहक आहेत. पैकी २.५७ लाख ग्राहकांवर थकबाकी असून या थकबाकीची रक्कम रु.२१२.६७ कोटी इतकी आहे. या नागरिकांना थकीत रक्कम भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मनपा ने ही योजना सुरु केलेली आहे. मोठ्या संख्येने नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्यावतीने नवीन मा. महापौर श्री. दयाशंकर तिवारी व स्थायो समिती अध्यक्ष श्री. विजय झलके यांनी नागपूरकरांना या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेंतर्गत आपली थकीत रक्कम भरण्यासाठी नागरिकांनी आपल्या नजीकच्या झोन कार्यालयात संपर्क करावा. आपली थकीत रक्कम जाणून घेण्यासाठी १८००२६६९८९९ वर कॉल अथवा www.ocwindia.com वर लॉग इन देखील करता येईल.
पाणीकर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे. आपली थकीत रक्कम पूर्ण भर अनिऊ अभिमानाने जग!
रविवारी झोन कार्यालयांमधील बिलिंग काउंटर्स राहणार सुरु…
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/38MPpD5
via
No comments