लाल बहाद्दुर शास्त्री महाविद्यालयात डेल डिजिटल लिटरेसी व बालकांचे अधिकार विषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न
पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील लाल बहाद्दुर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय बाबुलवाड़ा येथे दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी मुंबई येथील होप फॉउंडेशन तर्फे डेल डिजिटल लिटरेसी प्रोग्राम अंतर्गत कम्प्यूटर लैबचे उद्घाटन करण्यात आले असून सोबतच विद्यार्थ्याना बालकांचे अधिकार व संरक्षण आणि वाहतुकीचे नियमांविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.
मुंबई येथील होप फॉउंडेशनचे संचालक प्रभुकुमार यांनी महाविद्यालयात डेल डिजिटल लिटरेसी प्रोग्राम सुरु करनेसाठी डिजिटल कम्प्यूटर लैबचे उद्घाटन केले आणि या प्रोग्राम अन्तर्गत चालणारा अभ्यासक्रम आणि विविध उपक्रम विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोबतच महिला व बाल विकास कार्यालय नागपुर येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठान व विनोद शेंडे , बाल कल्याण समिती नागपुरचे अध्यक्ष राजीव थोरात यांनी बालकांचे अधिकार व संरक्षण संबंधी कायदेविषयक व संवैधानिक बाबींची सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले . तशेच पारशिवनी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा पलनाटे यांनी विद्यार्थ्यामध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून वाहतूक नियम व कायद्याची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजेश्री उखरे यांच्या मार्गदर्शनात व पर्यवेक्षक एन. जी. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले असून सूत्रसंचालन एस. झाड़े तर आभार प्रदर्शन देवेंद्र केदार यांनी केले .
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Yn8Zjh
via
No comments