स्मार्ट सिटीच्या हेरीटेज सायकल ट्रेल ला उस्फूर्त प्रतिसाद
मनपा आयुक्तांनी दाखवली हिरवी झेंडी
नागपूर : नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड आणि आरेंज ओडिसीच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सिव्हील लाईन्स, नागपूर अंतर्गत हेरीटेज सायकल ट्रेल चे आयोजन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी सायकल ट्रेल ला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.
इंडिया सायकल फार चेंज चॅलेंज स्मार्ट सिटीज मिशन, भारत शासनाचे गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालय च्या विविध उपक्रमांतर्गत हेरीटेज सायकल ट्रेल आयोजित करण्यात आले होते.
मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी च्या वतीने हेरीटेज सायकल ट्रेलचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर फार जुने शहर आहे. इथे हेरीटेजचे चांगले साईट आहे. याचे उध्दीष्ट नागरिकांना सायकल चालविण्याकरीता जागरुक करणे आहे तसेच सिव्हील लाईन्सच्या हेरीटेज इमारतीबददल माहिती देणे आणि त्याचे संरक्षण करणे आहे. मनपाचे कर्मचारी दर महिन्याला एक दिवस सायकलनी येतात. सायकलिंग आरोग्यासाठी उत्तम आहे. स्मार्ट सिटीचा वतीने सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकांनी सायकलचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांचा मार्गदर्शनामध्ये सायकल ट्रेलचे सफल आयोजन करण्यात आले होते.
सायकल ट्रेल नागपूर महानगरपालिकेपासुन सुरु होऊन ऑल सेंट कॅथेड्रल, बिशप काटन शाळा, नागपूर सुधार प्रन्यास १८४० चर्च, छत्री कस्तुरचंदपार्क, सीताबर्डी किल्ला, रिजर्व बँक ऑफ इंडिया, जीरो माइल स्टेशन, आदिवासी गोवारी शहीद स्मारक, मध्यवर्ती संग्राहलय, मीठा नीम बाबा दरगाह, विधान भवन, आकाशवाणी भवन, जुने फायर सर्विस कालेज, जुने हाईकोर्ट इमारत, जनरल पोस्ट ऑफीस फिरुन बाम्बे हाईकोर्ट नागपूर खंडपीठ येथे समाप्त झाली. बाम्बे हाईकोर्टच्या नागपूर खंडपीठ मध्ये आर्किटेक्ट अमोल वंजारी यांनी माहिती सादर केली.
या सायकल ट्रेलमध्ये नगरसेविका डॉ. परिणीता फुके, उपायुक्त आणि स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे, स्मार्ट सिटीच्या कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकुर, पर्यावरण विभागच्या महाव्यवस्थापक (प्र) डॉ.परिणीता उमरेडकर, ई-गर्व्हन्सचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले, मुख्य नियोजक राहुल पांडे, अमित शिरपुरकर, डॉ. पराग अरमल, डॉ. मानस बागडे, डॉ. अमित समर्थ, आरेंज ओडिसीच्या मंदिरा नेवारे, शिवानी शर्मा, लहान-लहान मुले-मुली या ट्रेल मध्ये सहभागी झाले.
स्मार्ट सिटीच्या हेरीटेज सायकल ट्रेल ला उस्फूर्त प्रतिसाद
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2YhTBog
via
No comments