अतिक्रमण निर्मूलनासाठी मनपाला मिळणार २० पोलिस कर्मचारी
महापौरांची पोलीस आयुक्त सोबत चर्चा
नागपूर : नागपूर महानगरपालिकेला अतिक्रमण निर्मूलनच्या अभियानात पोलिसांचा संपूर्ण सहकार्य मिळेल तसेच २० पोलिस कर्मचारी मनपाच्या अतिक्रमण अभियानात सोबत राहतील, असे पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांना सांगितले.
श्री. दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना अतिक्रमण निर्मूलन अभियानात पोलिसांचे सहकार्य मागितले. त्यांनी सांगितले की, पूर्वी पोलिस विभागाकडून वीस पोलिस कर्मचारी मनपाला सहकार्य करीत होते. त्यांचे वेतन आणि इतर भत्ते मनपाकडून दिले जात होते. नंतर पोलिसांनी आपले कर्मचारी परत मागवून घेतले. महापौरांनी पोलिस आयुक्तांना ही व्यवस्था परत सुरु करण्याचे निवेदन दिले.
पोलिस आयुक्तांनी त्यांच्या निवेदनाला तात्काळ होकार देवून २० पोलिस कर्मचारी मनपाच्या सेवेत परत देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी महापौर यांच्या समवेत उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते श्री. संदीप जाधव, आमदार श्री. कृष्णा खोपडे, श्री.विकास कुंभारे आणि आमदार श्री. प्रवीण दटके आदी उपस्थित होते.
अतिक्रमण निर्मूलनासाठी मनपाला मिळणार २० पोलिस कर्मचारी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3a3LFN5
via
No comments