गांधीबाग झोनमध्ये ६०० किलो प्लॉस्टिक जप्त
– मनपाच्या उपद्रव शोध पथकाची कामगिरी : ५ हजाराचा दंड
नागपूर : प्रतिबंधित प्लॉस्टिकच्या संदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गांधीबाग झोनमध्ये गुरुवारी (ता.२८) कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोनमधील उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लॉस्टिक कॅरीबॅग वजन ६०० किलो जप्त करण्यात आले.
पहिल्या गुन्हयासाठी त्याला रु ५ हजार दंड लावण्यात आला असून प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या मालाची अंदाजे किंमत दहा हजार रुपये आहे. ही कारवाई गुरुवारी (ता. २८) दुपारी २.०० वाजता टेलिफोन एक्चेंज चौक येथे करण्यात आली.
पकडण्यात आलेले वाहन क्रमांक एमएच ४९ – एटी ०५७४ असून गाडी चालकाचे नाव सुरेश असे आहे. गाडीचे कागदपत्र तापासल्यानंतर गाडी मालक गुडडू शर्मा आहे.
गांधीबाग झोनमध्ये ६०० किलो प्लॉस्टिक जप्त
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3pxM1Ci
via
No comments