महावितरण चे शटडाऊन: कन्हान जलशुद्धीकरण केंद्र जाने १५ (शुक्रवार) रोजी ४ तास बंद राहणार
लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित…
बाधित भागांत टँकर पुरवठा ही बंद राहणार
नागपूर: महावितरण, कामठी ह्यांनी ला 33KV आणि 11KV ह्या विद्यत वाहिनीवर येत्या जानेवारी १५, २०२१, सकाळी १० ते २ दरम्यान ४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.
त्यामुळे नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर संचालित कन्हान जलशुद्धीकरण केंद्र देखील ४ तासाकरिता बंद राहील व कन्हान जलशुद्धीकरण केंद्र वर आधारित लकडगंज , सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.
या कामामुळे खालील जलकुंभांचा पाणीपुरवठा ४ नोव्हेंबर (बुधवार) सकाळी ११ ते ५ नोव्हेंबर (गुरुवार) सकाळी ११ दरम्यान बाधित राहील:
आशी नगर झोन: बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग
सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १, २अ व २ब, शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग
नेहरू नगर झोन: नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ
लकडगंज झोन: भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, व पारडी १ व २ जलकुंभ
यादरम्यान जवळपास लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे., त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.
महावितरण चे शटडाऊन: कन्हान जलशुद्धीकरण केंद्र जाने १५ (शुक्रवार) रोजी ४ तास बंद राहणार
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2XB43XN
via
No comments