राष्ट्रवादीचा नायलॅास मांज्या विक्री विरूद्ध एलगार
राज्यांत नायलॉन मांजाच्या विक्रीस बंदी असून संक्रांतीच्या काळात सर्रासपणे नायलॉन मांजा प्रशासनाच्या गलथन चुकीमुळे सर्रास विकल्या जातो आणि याची परिणीती म्हणून नागपूर स्थित भावी इंजिनियर प्रणय ठाकरे वय 21 वर्षे यांना आपला भर रस्त्यामध्ये जीव गमवावा लागला.
अशा अतिशय दुर्दैवी घटना भविष्यात होऊ नये याकरिता या जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री व त्यावरील बंदी हा एकमेव उपाय असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे सध्याच्या काळात अतिशय आवश्यक आहे.
आज दिनांक १८/०१/२०२१ रोजी राष्ट्रवादी डॉक्टर सेल तर्फे मा. महापौर श्री दयाशंकरजी तिवारी साहेब व मा. जिल्हाधिकारी श्री रविन्द्रजी ठाकरे यांना निवेदन पत्रक डॅाक्टर सेलचे शहर जिल्हाध्यक्ष डॅा. नितीन कान्होलकर , सरचिटणीस डॅा. मनोहर ठाकरे ,चिटणीस डॅा. संकेत दुबे, डॅा. राहुल राऊत यांनी दिले.
राष्ट्रवादी डॅाक्टर सेल तर्फे विनंती करण्यात आली की या गंभीर प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देऊन संक्रांतीच्या काळात विकल्या जाणाऱ्या नायलॉन मांजा विक्रीच्या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी .
यांवर मा. महापौर म.न.पा. नागपूर श्री दयाशंकरजी तिवारीजींनी यांनी विस्तृत सकारात्मक चर्चा केली व मा. जिल्हाधिकारी नागपूर श्री रविन्द्रजी ठाकरे यांनी प्रणय न्याय माळण्यासाठी योग्य कारवाई करण्यात येईल अशी हमी दिली.
राष्ट्रवादीचा नायलॅास मांज्या विक्री विरूद्ध एलगार
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3bV4WTo
via
No comments