Breaking News

महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांची मेट्रो भवनला सदिच्छा भेट

Nagpur Today : Nagpur News

– शहराच्या विकासकामांवर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याशी विस्तृत चर्चा

नागपूर– आज नागपूर महानगर पालिका आयुक्त श्री. राधाकृष्ण बी. यांनी महा मेट्रोचे प्रशासकीय कार्यालय असलेले – मेट्रो भवनला सदिच्छा भेट दिली. महापालिका आयुक्त यांनी मेट्रोच्या या कॉर्पोरेट ऑफिसच्या तळमजल्यावर व्हिजिटर्स आणि विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची तसेच तिथे स्थापन झालेल्या प्रदर्शनाची देखील पाहणी केली.

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याशी महा मेट्रो आणि नागपूर महानगरपालिकातर्फे संयुक्त पणे राबविण्यात येत येणाऱ्या विविध विकास कामांसंबंधी विस्तृत चर्चा केली. यावेळी कार्यकारी संचालक श्री. अनिल कोकाटे यांनी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे विस्तृत सादरीकरण केले.

चर्चे दरम्यान सायकल ट्रॅकची उभारणी, मल्टी मोडेल इंट्रीग्रेशन, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, फिडर सर्विस व इतर विषयांवर सविस्तर चर्चा दोन्हीही कडील अधिकाऱ्यांदरम्यान झाली. शहरात नागपूर मेट्रोच्या रूपाने अतिशय चांगल्या वाहतूक प्रणालीचे निर्माण झाले असून, आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूरात उपलब्ध आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे आयुक्त म्हणाले. या सेवेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे मत श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपली बसच्या माध्यमाने शहराच्या कुठल्याही भागातून मेट्रो स्टेशन पर्यंत नागरिकांना पोहोचता येते असे ते या भेटी दरम्यान म्हणाले. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पैसे वाचविण्यास मदत होत असून पर्यावरण राखण्यास देखील मदत होत असे त्यांनी नमूद केले. यावेळी संचालक (रोलिंग स्टॉक आणि सिस्टम) श्री. सुनील माथूर,संचालक(वित्त) श्री. एस. शिवमाथण तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांची मेट्रो भवनला सदिच्छा भेट



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/38UvBNg
via

No comments