Breaking News

नागपूरची जयश्री बावनकर ठरली उपविजेती

Nagpur Today : Nagpur News

मिसेस वेस्‍ट इंडिया इम्‍प्रेस ऑफ वेस्‍ट इंडिया – 2020 सीझन 3

Jayashree Bawankar

Jayashree Bawankar

नागपूर: मिसेस वेस्‍ट इंडिया इम्‍प्रेस ऑफ वेस्‍ट इंडिया – 2020 सीझन 3 च्‍या अंतिम फेरी नागपूरच्‍या सौंदर्यवती जयश्री बावनकर गोल्‍ड गटात तिस-या क्रमांकाच्‍या उपविजेत्‍या ठरल्‍या असून त्‍यांना मिसेस इंटेलिजेंटचा क‍िताबही प्राप्‍त झाला आहे.

दिवा प‍िजेंट्सच्‍यावतीने अलिला दिवा यांनी 28 नोव्‍हेंबर रोजी मिसेस वेस्‍ट इंडिया इम्‍प्रेस ऑफ वेस्‍ट इंडिया – 2020 सीझन 3 च्‍या अंतिम फेरीचे गोवा येथे आयोजन केले होते. महाराष्‍ट्र, गुजरात व गोवा या राज्‍यांचे प्रतिनिधीत्‍व करणा-या 47 विवाहीत सौंदर्यवतींनी या स्‍पर्धेत सहभाग नोंदवला होता. स्‍पर्धेत 20 ते 36 वर्षे वयोगटासाठी सिल्‍व्‍हर आणि 37 व त्‍यावरील वयोगटासाठी गोल्‍ड असे दोन गट करण्‍यात आले होते. जयश्री बावनकर या गोल्‍ड गटातील स्‍पर्धेत सहभागी झाल्‍या होत्‍या. प्रत्‍येक गटातून अंतिम फेरीसाठी सर्वोत्‍तम स्‍पर्धक निवडण्‍यात आले होते त्‍यात जयश्री बावनकर यांचा समावेश होता.

विनय अरान्‍हा हे या स्‍पर्धेचे प्रमुख प्रायोजक होते तर जहांगीर ओरा, केअर डेंटल सेंटर सहप्रायोजक होते. कार्ल आणि अंजना मास्‍कॅरेन्‍हास यांची संकल्‍पना असलेल्‍या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्‍हणून केंद्रीय राज्‍यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांची उपस्थित होते. अभिनेत्री महक चहल, अभिनेत्री ब्रुना अब्‍दुल्‍ला, सुहानी मॅडोन्‍सा, डिझायनर ग्‍वेन डी, विवेक मॅडोन्‍सा हे प्रख्‍यात परीक्षक लाभले. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते अमन वर्मा यांनी केले होते.

जयश्री यांचे वय चाळीस असून त्‍यांनी डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ मधून बीएएलएलबी केले आहे. मुंबई विद्यापीठातून एलएलएम केलेल्‍या जयश्री यांना या अभ्‍यासक्रमासाठी सुवर्णपदक प्राप्‍त झाले आहे. अभियंता असलेल्‍या अभिजीत बावनकर यांच्‍याशी विवाह झाल्‍यानंतर त्‍या काही काळ दुबई व दोहा येथे वास्‍तव्‍यास होत्‍या. नृत्‍य आणि मॉडेलिंगची आवड असलेल्‍या जयश्री यांना फॅशन कोरिओग्राफी आणि डान्‍स कोरिओग्राफीमध्‍येदेखील रूची आहे. जयश्री यांना पारूल आणि स्‍वरा या दोन मुली आहेत.

त्‍यांनी यापूर्वी कतार येथे 2016 साली झालेल्‍या सौंदर्य स्‍पर्धेत विजेतेपद पटकावले होते. याशिवाय, नागपूर येथे झालेल्‍या मिसेस विदर्भ टॅलेंट आयकॉन 2020 सौंदर्य स्‍पर्धेतही त्‍या प्रथम उपविजेत्‍या ठरल्‍या होत्‍या.

लॉच्‍या प्रोफेसर असलेल्‍या जयश्री म्‍हणाल्‍या, ‘लॉच्‍या क्षेत्रात कार्यरत असताना केवळ कुटूंबाच्‍या सहकार्यामुळेच मला मॉडेलिंगमध्‍ये करीअर करता येणे शक्‍य झाले आहे. मिसेस वेस्‍ट इंडियाची उपविजेती होण्‍याचा मान मिळाला आणि सोबत मिसेस इंटेलिजेंटचा किताबही मिळाल्‍यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. भविष्‍यात अशा सौंदर्य स्‍पर्धांकरीता महिलांचे ग्रुमिंग करण्‍याचा मानस असून सौंदर्य, बुद्धिमत्‍ता यांच्‍या बळावर नागपुरातील सौंदर्यवतींनी ब्‍युटी गाजवाव्‍या, अशी माझी इच्‍छा आहे.’

नागपूरची जयश्री बावनकर ठरली उपविजेती



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2JA8yOZ
via

No comments