Breaking News

मनसर तुमसर राष्ट्रीय महामार्गाची चौकशी करा

Nagpur Today : Nagpur News

– मनसेचे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर यांना निर्वाणीचा इशारा


रामटेक- रामटेक तालुक्यामधून जाणाऱ्या मनसर तुमसर राष्ट्रीय महामार्गाच्या गुणात्मक दर्जा ची तात्काळ चौकशी करून कारवाई करा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक तालुका अध्यक्ष श्री शेखरभाऊ दुन्डे यांनी उपतालुका अध्यक्ष मनोज पालीवार उपतालुका अध्यक्ष देवा महाजन उपतालुका अध्यक्ष सुखदेव मोरे उपशहर अध्यक्ष सुरेंद्र शुक्ला आकाश वाट गोरे अमोल पवार मनीष खडसे रमेश संदीप वासनिक योगेश व्होरा यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग नागपूर चे कार्यकारी अभियंता श्री बोरकर यांना दिले गेल्या अनेक पासून सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाची रस्ते कामाची पाहणी करून माहिती घेतली असता अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले रायपुर दराने रस्ते बांधकामात कोणत्याही प्रकारचे लक्ष नसून सगळी कामे अनियंत्रित तसेच निकृष्ट दर्जाची सुरू असल्याचे उघड झाले.

दर्जाबाबत कंत्राटदाराचे अभियंते यांनी नाव नंबर सांगण्याच्या नावावर निकृष्ट दर्जा बाबत सविस्तर माहिती दिल्याचे बैठकीत कार्यकारी अभियंता यांना सांगण्यात आले सदर विषयावर राष्ट्रीय महामार्गाच्या सल्लागारांचे प्रतिनिधी अभियंते कंत्राटदाराचे प्रतिनिधी तसेच विभागाचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता श्री बोरकर यांचे बरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेदरम्यान अभियांत्रिक व निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी खेद व्यक्त करून कं कंत्राटदाराद्वारे सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे फोटो कार्यकारी अभियंता यांना दाखविण्यात आले त्याच वेळी कामात सुरू असलेली दिरंगाई याबाबत कंत्राटदारांवर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करण्याबाबत मागणी करण्यात आली राष्ट्रीय महामार्ग विभागाद्वारे बांधणीच्या गुणवत्तेसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असूनही काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत खेद व्यक्त करून अशा सल्लागाराला बरखास्त करून नवीन सल्लागार नियुक्त करण्याची मागणी मनसे’चे शिष्टमंडळांनी केली चर्चेदरम्यान काही गंभीर मुद्यांवर सविस्तर चर्चा होऊन प्रामुख्याने खालील मागण्या केल्या गेल्या.

१) बांधकामाच्या गुणवत्तेची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्यात यावी.
२) निवेदनानुसार कामाचा कालावधी संपला असून कामातील दिरंगाईबद्दल कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून कंत्राटदारास काढा यादीत टाकण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी.
३) राष्ट्रीय महामार्ग बांधत असताना रस्त्यालागत असलेले मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे ही विभागाची जबाबदारी असून असे कोणत्या प्रकारचे वृक्षारोपण झाले दिसत नाही सदर विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात यावा जेणेकरून पर्यावरणाचे संतुलन ठेवणे शक्य होईल अशी मागणी करण्यात आली
४) रस्त्याची पाहणी करीत असताना असे लक्षात आले की संपूर्ण कामात रामटेक तालुक्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला नाही चर्चेदरम्यान कंत्राटदाराला तात्काळ स्थानिकांना रोजगार देण्याबाबत समज देण्यात आली.
५) रस्त्यांचे अनियंत्रित व अर्धवट कामामुळे तालुक्यात धुळीचे साम्राज्य असून स्थानिकांना श्वासाचे आजार मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत कंत्राटदाराला अर्धवट रस्त्यावर दिवसातून तीन वेळा पाणी मारण्याचे निर्देश देण्याबाबत सांगण्यात आले.
६) रस्त्यालगत बांधण्यात आलेली नाली ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्याची तात्काळ गुणात्मक पाहणी करण्याबाबत सूचना आले.
७) अनियंत्रित रस्ते बांधकामामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असून कोणत्या प्रकारचे सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याने हे अपघात घडत आहेत हे कार्यकारी अभियंता यांना जाणीवपूर्वक सांगून तात्काळ सुरक्षा नियमांप्रमाणे सर्व ते उपाययोजनांची मागणी करण्यात आली.
८) कोणत्याही परिस्थितीत कंत्राटदाराला मुदत वाढ न देता कामातील झालेल्या विलंबासाठी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली मुदतवाढ दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून त्याच्या विरोध करील असे चर्चा स्पष्ट करण्यात आले.
९) रस्ते बांधकाम निवेदित विद्युतीकरणाचे काम असून असे कोणतेही काम कंत्राटदाराद्वारे सुरु झालेले दिसून येत नाही सदर काम सुरू करून तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली.
कामाचे गांभीर्य विचारात घेऊन कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदाराला लवकरात लवकर पूर्ण करण्यासंबंधी लिखित निर्देश दिले तसेच चर्चेवर सकारात्मक विचार करून काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व ते उपाय योजना करण्यात येईल असे आश्वासन दिले.
मनसे रामटेक तालुका अध्यक्ष श्री शेखरभाऊ दुंडे यांनी निवेदन दिले त्यावेळेला झालेल्या बैठकीला उपतालुका अध्यक्ष मनोज परिवार व सर्व मनसे सैनिक उपस्थित होते. त्याचबरोबर विभागातील संबंधित अधिकारी व कंत्राटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मनसर तुमसर राष्ट्रीय महामार्गाची चौकशी करा



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/37cJFBM
via

No comments