दिघोरी जलकुंभ व रेशीमबाग जलकुंभ यांचे शटडाऊन शुक्रवार ४ डिसेंबर रोजी
शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील बंद…
नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी दिघोरी जलकुंभाच्या आऊटलेटवर फ्लो मीटर बसविण्याच्या व इतर काही देखरेखीच्या कामांसाठी शुक्रवार ४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान १२ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.
दिघोरी जलकुंभाच्या शटडाऊनमुळे खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील: सर्वश्री नगर, वैभव नगर, कीर्ती नगर, टेलीफोन नगर, बेलदार नगर, संत तुकडोजी नगर, महानंदा नगर, आझाद कॉलोनी, दिघोरी, रामकृष्ण नगर.
याच दरम्यान नागपूरकरांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यास कटिबद्ध असलेले मनपा-OCW रेशीमबाग जलकुंभाची स्वच्छतादेखील शुक्रवार ४ डिसेंबर रोजी करणार आहेत.
या जलकुंभ स्वच्छतेच्या कामामुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: ओम नगर, सुदामपुरी, आनंद नगर, नेहरू नगर, महावीर नगर, शिव नगर, जुने नंदनवन, भगत कॉलोनी, गायत्री नगर, गणेश नगर, जुनी शुक्रवारी, लभानतांडा
या कामांदरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
For any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.
दिघोरी जलकुंभ व रेशीमबाग जलकुंभ यांचे शटडाऊन शुक्रवार ४ डिसेंबर रोजी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3mwudG2
via
No comments