मास्क न लावणा-या २५७ नागरिकांकडून दंड वसूली
आतापर्यंत १९२९६ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २५७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १९२९६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ८०,०७,०००/- चा दंड वसूल केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असले तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २८, धरमपेठ झोन अंतर्गत ५४, हनुमाननगर झोन अंतर्गत ३८ धंतोली झोन अंतर्गत १५, नेहरुनगर झोन अंतर्गत १९, गांधीबाग झोन अंतर्गत १४, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ११, लकडगंज झोन अंतर्गत १२, आशीनगर झोन अंतर्गत २१, मंगळवारी झोन अंतर्गत ४२ आणि मनपा मुख्यालयात ३ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १३८२६ बेजबाबदार नागरिकांकडून रु ६९ लक्ष १३ हजार वसूल करण्यात आले आहे.
मास्क न लावणा-या २५७ नागरिकांकडून दंड वसूली
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3kyXbTZ
via
No comments