बावनकुळेंवर पुन्हा जबाबदारी -“पदवीधर निवडणूक : निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती
नागपूर : लवकरच होत असलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि प्रदेश भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने पुन्हा जबाबदारी सोपविली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नागपूर विभाग निवडणूक प्रमुख म्हणून बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.
पदवीधर निवडणुकीत बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपाला दणदणीत यश मिळेल, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सातत्याने निवडून येत आहेत. हा भाजपाचा बालेकिल्ला आहे.
स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदार संघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आहे. अनिल सोले या मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत.
राज्यात भाजपाचे सरकार नाही. सत्तारूढ महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे यावेळी ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्या या जबाबदारीचे महत्त्व वाढले आहे.
बावनकुळेंवर पुन्हा जबाबदारी -“पदवीधर निवडणूक : निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/32troNX
via
No comments