जातीपातीच्या नावावर फक्त कमजोरच मत मागतात : आमदार कृष्णा खोपडे
पूर्व आणि उत्तर नागपूरमध्ये संदीप जोशी यांचा झंझावाती प्रचार दौरा
नागपूर, ता. २८ : संदीप जोशी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत. समाजातील तळागाळातील लोकांसाठी त्यांचे कार्य सातत्याने सुरू आहेत. विरोधकांकडे सांगण्यासाठी किंवा दाखविण्यासाठी कोणतेही सामाजिक वा विकासाचे मुद्दे नाहीत त्यामुळे ते जातीचे राजकारण करीत आहेत. मात्र जातीपातीच्या नावावर फक्त कमजोरच मतं मागतात, असा टोला पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी लगावला.
भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या पूर्व नागपूरमधील प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.
शनिवारी (ता.२८) महापौर संदीप जोशी यांनी पूर्व आणि उत्तर नागपुरातील विविध भागात झंझावाती संपर्क दौरा केला. विविध ठिकाणी झालेल्या प्रचार दौऱ्यामध्ये पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह शिक्षक आमदार नागो गाणार, आमदार गिरीश व्यास, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, मनपाचे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सिंधी हिंदी विद्या समितीचे अध्यक्ष हरीश बाखरू, चेअरमन डॉ. विंकी रूघवानी, महासचिव आय.पी. केशवानी, नवनीतसिंग तुली, भाजपा उत्तर नागपूरचे अध्यक्ष संजय चौधरी, प्रभाकरराव येवले, सिंधू महाविद्यालयाचे प्राचार्य कसबेकर, खोरिप चे नेते माजी आमदार उपेंद्रजी शेंडे, भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष राजेशजी हाथीबेड, सुभाषजी पारधी, अशोकजी मेंढे, रमेशजी फुले, नगरसेवक गोपीचंदजी कुमरे, नगरसेविका निरंजनाताई पाटील, दुर्गाताई हत्तीठेले, ज्येष्ठ नेते श्री. घनश्यामदासजी कुकरेजा, श्री. रूपचंदानी, श्री. क्रिपा लालवानी, दीपाताई लालवानी, अशोकजी लालवानी, भाजपा उत्तर नागपूर अध्यक्ष श्री. संजय चौधरी, नगरसेविका सुषमाताई चौधरी, नगरसेविका प्रमिलाताई मंथरानी, सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष वीणाताई बजाज, डिम्पीताई बजाज यांच्यासह बहुसंख्य पदवीधर मतदार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संदीप जोशी यांनी पूर्व नागपूरमध्ये स्वामी सितारामदास विद्यालय, प्रितम भवन, गोरोबा कुंभार सभागृह वाठोडा, शक्तीमाता नगर हनुमान मंदिर, भारतनगर हिमालय सेलिब्रेशन, डिप्टी सिग्नल, नंदनवन लक्श्मीनारायण मंदिर, उत्तर नागपूरमधील सिंधी हिंदी विद्या समिती, जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या विद्यालय, कडबी चौक, महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू स्कूल, राजकुमार केवलरामानी हायस्कूल, सेन मायकल हायस्कूल, एसोफेस हायस्कूल, दयानंद आर्य कन्या विद्यालय, गुरूनानक फार्मसी कॉलेज, विनोबा भावे नगर, महर्षी दयानंद नगर, सिंधी हिंदी हायस्कूल, एसीएस गर्ल हायस्कूल आदी ठिकाणी प्रचारदौरा केला.
पुढे बोलताना आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, पदवीधर मतदारसंघातील मतदार हे जाणकार, सुज्ञ, हुशार आहेत. ते आपला प्रतिनिधी निवडताना त्याचे सामाजिक, शैक्षणिक कार्य पाहूनच मत देतील. जातीपातीचे राजकारण करून सुशिक्षितांची दिशाभूल करणाऱ्यांना ते त्यांची जागा दाखवतील हा विश्वास आहेच. मात्र समाजकार्य आणि विकासाचे दृष्टीकोन असणाऱ्यांच्या विरोधात जातीचे दंड थोपटून उभे राहणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असा धडा त्यांना शिकवा, असे आवाहनही त्यांनी केले.
जातीपातीच्या नावावर फक्त कमजोरच मत मागतात : आमदार कृष्णा खोपडे
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/37bT1g2
via
No comments