हनुमान नगर, धंतोली, नेहरूननगर झोनचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करा
स्थायी तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांचे निर्देश
नागपूर : शहरात अनेक ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा न होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. नियमित पुरवठा न होणे, पाण्याचा संथ प्रवाह, अनेक दिवसांपासून पुरवठाच न होणे अशा समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील हनुमान नगर, धंतोली आणि नेहरूनगर या तिनही झोनमधून अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. पाणी पुरवठ्याच्या संदर्भातील तक्रारींमुळे स्थानिक लोकप्रतिनिधींवरही नागरिक रोष व्यक्त करतात. याबाबत गांभीर्याने लक्ष देउन तातडीने तिनही झोनचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करा, असे निर्देश स्थायी तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
पाणी पुरवठ्या संदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने गुरूवारी (ता.२९) स्थायी तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या विशेष उपस्थितीत आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत प्रतोद दिव्या धुरडे, जलप्रदाय समिती उपसभापती भगवान मेंढे, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक डॉ.रवींद्र (छोटू) भोयर, नगरसेविका उषा पॅलेट, विद्या मडावी, कल्पना कुंभलकर, भारती बुंदे, वंदना भगत, नगरसेवक दिपक चौधरी, राजेंद्र सोनकुसरे, सहाय्यक नगररचना संचालक प्रमोद गावंडे, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्लू चे संजय रॉय, के.एम.पी.सिंग, राजेश कालरा यांच्यासह तिनही झोनचे डेलिगेट्स उपस्थित होते.
प्रारंभी स्थायी तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आमदार मोहन मते व अन्य पदाधिकाऱ्यांनी तिनही झोनच्या डेलिगेट्सकडून स्थितीचा आढावा घेतला. हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूनगर झोनमधील कमांड एरीयाची स्थिती, कमांड एरीयाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणारे प्रभाग आणि तेथील समस्या याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. अमृत योजनेअंतर्गत अनेक भागात कार्य सुरू असल्याने पाणी पुरवठ्यामध्ये अडचण निर्माण होत असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश स्थायी तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले. नगरसेवक डॉ. छोटू भोयर यांनी आपल्या प्रभागातील चंदननगर, रेशिमबाग मधील पाण्याची परिस्थीती सांगितली, नगरसेवक नागेश सहारे यांनी ताजबाग परिसरातील तसेच नगरसेविका दिव्या धुरडे यांनी त्यांच्या प्रभागातील समस्याबददल माहिती दिली.
‘सम्प’ संदर्भात शक्य तेवढी मदत करू
बैठकीत रघूजीनगर येथील म्हाडा कॉलनी रहिवासी नागरिकही आपल्या तक्रारींसह उपस्थित होते. रघूजीनगर येथील म्हाडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांद्वारे वैयक्तीक नळ कनेक्शनची मागणी यावेळी करण्यात आली. गुरूवारी सकाळी झालेल्या बैठकीमध्ये महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थापत्य समिती सदर कॉलनीचे निरीक्षण करणार असल्याची माहिती यावेळी स्थायी तथा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली. रघूजीनगर म्हाडा कॉलनीमध्ये स्वतंत्र नळ कनेक्शन देताना त्यासाठी ‘सम्प’ तयार करणे ही अत्यावश्यक बाब आहे. त्यासाठी कॉलनीमध्ये जागा उपलब्ध झाल्यास मनपाद्वारे शक्यतो तेवढी मदत करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. स्थायी तथा जलप्रदाय समिती सभापतींच्या या सूचनेला दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, स्थानिक नगरसेवक डॉ.रवींद्र (छोटू) भोयर, उषा पॅलेट यांनीही दुजोरा दिला. या संबंधात तोडगा काढण्यासाठी आमदार मोहन मते, पिंटू झलके, डॉ. भोयर व अन्य जनप्रतिनिधी म्हाडा कॉलोनीचा दौरा करतील.
हनुमान नगर, धंतोली, नेहरूननगर झोनचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करा
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3kGATk7
via
No comments