Breaking News

गांधी भूमी सेवाग्रामला जागतिक स्तरावर ओळख देण्याकरिता कटिबद्ध– मुख्यमंत्री

Nagpur Today : Nagpur News

– पालकमंत्री सुनील केदार यांनी गांधी प्रतिमा देऊन केले मुख्यमंत्र्याचे स्वागत

नागपुर/वर्धा/मुम्बई – ज्या भूमीतून महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जावं चा नारा देत स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या मनात रोवली अश्या पुण्यभूमी सेवाग्राम ला जागतिक स्तरावर ओळख देण्याकरी सदैव कटिबद्ध राहील अशी प्रतिवचन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम विकास आराखडा उद्धाटन कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थिती दर्शविली होती. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत महात्मा गांधी प्रतिमा स्वागतपर भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे यांनी सेवाग्राम विकास आराखड्याची संपूर्ण या विस्तृत माहिती घेतली. या आराखड्या करिता निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुनील केदार यांना दिली.

वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा असून महात्मा गांधी यांच्या स्वप्नानुसार ” गाव बनाव- देश बनाव” या उक्तीप्रमाणे ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्याकरिता विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्री यांना दिली. येत्या काळात वर्धा नगरीला जागतिक स्तरावर ओळख देण्याकरिता महाविकास आघाडी कटिबद्ध राहील असे प्रतिवचन मुख्यमंत्री ठाकरे व पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

गांधी भूमी सेवाग्रामला जागतिक स्तरावर ओळख देण्याकरिता कटिबद्ध– मुख्यमंत्री



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3jFxaCy
via

No comments