Breaking News

लकडगंज कडबी बाजार होणार मोकळे

Nagpur Today : Nagpur News

– जागेवरील लीज निरस्त करण्याचे ॲड.धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश

नागपूर : लकडगंज कडबी बाजार मैदान आणि भूखंड क्रमांक ११२, ११५ आणि ११६ ची जागा लवकरच मोकळी होणार आहे. यासंदर्भात मनपाद्वारे देण्यात आलेली लीज निरस्त करण्याचे निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहे.

यासंबंधी विधी समिती सभापती कक्षात झालेल्या बैठकीत सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्यासह प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, उपअभियंता सिंगनजुडे, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, लकडगंज झोनचे श्री. बिसेन, मोहरीर श्री.शिवणकर आदी उपस्थित होते.

लकडगंज येथील कडबी बाजार खुले मैदान आणि भूखंड क्रमांक ११२, ११५ आणि ११६ ची एकूण ३४ हजार वर्ग फूट जागा मनपाच्या मालकीची आहे. १९९२ मध्ये त्याची लीज देण्यात आली होती. मात्र लीजचे नूतनीकरण करण्यात आले नाही. अंकेक्षण झाले नाही. त्या जागेवर अतिक्रमणे झाली. या जागेच्या लीजची आकारणी, दंड असे अनेक विषयावर काय कार्यवाही झाली आदी मुद्यांची तपासणी करण्याकरिता समिती नेमण्यात आली. या समितीद्वारे तपासणी सुरू आहे.

सदर भूखंडापैकी खसरा क्रमांक ११२ वर काबरा पेट्रोल पम्प आहे. यासह खसरा क्रमांक ११५ आणि ११६च्या जागेवरही अतिक्रमण झालेले आहे. या सर्व जागांची लीज तातडीने निरस्त करून संपूर्ण जागा मोकळी करण्याचे निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले. विशेष म्हणजे मोकळ्या होणाऱ्या या जागेमध्ये ‘सिविक सेंटर’ तयार करण्यात येणार असल्याचे ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

सक्करदरा बाजारातील गाळे आवंटित करण्याची प्रक्रिया सुरू करा
सक्करदरा बाजारातील गाळे आवंटित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचेही निर्देश बैठकीत त्यांनी दिले. सक्करदरा बाजारामध्ये गाळ्यांसंदर्भात सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, याशिवाय गाळेधारकांसह मनपाला पुढे कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये याकरिता संरक्षण देणे आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात स्वच्छता राखणे या सर्व बाबींची पूर्तता करून तातडीने गाळे आवंटित करावे, असेही विशेषत्वाने विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी निर्देशित केले.

लकडगंज कडबी बाजार होणार मोकळे



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/31V0myQ
via

No comments