खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात सोशल डिस्टन्सचा फज्जा
– वीज केंद्राच्या प्रवेशद्वारा समोर शेकडो कर्मचाऱ्यांची गर्दी,संबंधित अधिकारी कुंभाकर्णी झोपेत,शासनाच्या आदेशाची अवहेलना,दोषींवर राष्ट्रीय आपत्ती कायद्या अंतर्गत वीज गुन्हे दाखल करा
खापरखेडा– कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीकोनातून गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्स पाळण्याचे शासनाचे आदेश आहेत मात्र खापरखेडा वीज केंद्र याला अपवाद असून शासनाच्या आदेशाची दररोज अवहेलना करण्यात येत आहे दररोज वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर शेकडो कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी गर्दी करीत असल्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे मात्र संबंधित अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत त्यामूळे शासनाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर राष्ट्रीय आपत्ती कायद्या अंतर्गत कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात सकाळच्या पाळीत सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना वीज केंद्राच्या चेमरी प्रवेशद्वार मधून प्रवेश दिला जातो मात्र दिलेल्या निश्चित वेळेनंतर कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिनांक ३० सप्टेंबर बुधवारला सकाळी निश्चित वेळे पलीकडे आलेल्या कर्मचाऱ्यांना वीज केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला यावेळी वीज केंद्राच्या चेमरी प्रवेशद्वार समोर एकाच वेळी शेकडो कर्मचाऱ्यांनी गर्दी केली मोठया प्रमाणात गर्दी झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गा पर्यंत झळ पोहचली त्यामूळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली शेवटी वाहतूक सुरळीत करण्यास पोलीसांना पाचारण करावे लागले खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात मोठया प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत शिवाय कंत्राटी कामगार व वीज केंद्र कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे
कोविड काळात थोडाफार उशिर झाल्यास गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून निश्चित वेळेत थोडाफार बदल करने अपेक्षित आहे मात्र मनमानी कारभार सुरू आहे देशासह राज्यात लाखो कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत जवळपास लाखांच्या वर कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे वीज केंद्र चेमरी प्रवेशद्वार परिसरात होत असलेली गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी आहे कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता आहे याची जाणिव स्थानिक वीज केंद्र प्रशासनाला आहे निश्चित वेळेत कर्तव्यावर पोहचण्याचा फतवा जारी करण्यात आल्यामुळे वीज केंद्राच्या तिन्ही पाळीत दररोज मोठया प्रमाणात कर्मचाऱ्यांची गर्दी होत असते मात्र उपाय-योजना करण्यात येत नाही त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ नुसार संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत असून यासंदर्भात जनसंपर्क माहिती अधिकारी व उपमुख्य अभियंता राजेंद्र राऊत यांच्याशी संपर्क साधला असता चौकाशी करून माहिती देणार असल्याचे सांगितले.
खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात सोशल डिस्टन्सचा फज्जा
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3jpOOdp
via
No comments