Breaking News

भंडारा जिल्ह्यात 5 हजार रूग्णांची कोरोनावर यशस्वी मात

Nagpur Today : Nagpur News

आज 53 डिस्चार्ज

भंडारा : जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 39 कोरोनाबाधित रूग्णांनी यशस्वी मात केली आहे. जिल्हयात आज 53 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5039 झाली असून आज 95 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6685 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.37 टक्के आहे.

आज 845 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 95 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 53 हजार 305 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 6685 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 22, साकोली 02, लाखांदूर 15, तुमसर 24, मोहाडी 02, पवनी 18 व लाखनी तालुक्यातील 12 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 5039 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 6685 झाली असून 1487 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 04 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 159 झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 3379, साकोली – 526, लाखांदुर- 314, तुमसर- 587, मोहाडी- 607, पवनी- 669 व लाखनी- 603 असे एकूण 6685 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 5039 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.37 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.37 टक्के एवढा आहे.

भंडारा जिल्ह्यात 5 हजार रूग्णांची कोरोनावर यशस्वी मात



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3lLOWFd
via

No comments