Breaking News

आगामी काळात एनडीएचं अस्तित्व धोक्यात – महेश तपासे

Nagpur Today : Nagpur News

मुंबई – शिरोमणी अकाली दलाने भाजपाच्या चुकीच्या धोरणांना उघडे पाडण्याचं धाडस दाखवून बाहेर पडण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे आगामी काळात एनडीएचं अस्तित्व धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केले आहे.

हळूहळू का होईना पण एनडीएमधील महत्त्वाचे घटकपक्ष आता एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचा एकमताच्या विचारावर विश्वास नसल्यामुळे आपला भांडवलशाही अजेंडा पुढे रेटण्यासाठी देशातील मजूर आणि शेतकर्‍यांच्या रूपाने किंमत मोजली जातेय असेही महेश तपासे म्हणाले.

भाजप सरकार लवकरच देशातील सर्व नफ्यात असणाऱ्या पीएसयूएसच्या किल्ल्या या मोठ्या भांडवलंदारांकडे सुपूर्द करण्याच्या तयारीत आहेत असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

शिरोमणी अकाली दलाने आता जाणीवपूर्वक एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला अनेकांचा पाठिंबा मिळेल असेही महेश तपासे म्हणाले.

भाजपने दिलेल्या खोट्या आश्वासनाबाबत देशातील लोक आता जागृत होत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकार सामान्य माणसाच्या अपेक्षांच्या कसोटीत पूर्णपणे पराभूत झाल्याचे दिसून येत आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात एनडीएचं अस्तित्व धोक्यात – महेश तपासे



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2G8v3IW
via

No comments