काचुरवाहीत सोम,मंगल,बुधवार जनता कफ्यू चे आवाहन -सरपंच
रामटेक: रामटेक तालुक्यास ५५० वर कोरोना रुग्णाचा आकङा पोहचला आहे तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान तीन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी सोमवारी 28 , मंगळवार 29, बुधवार 30 सायंकाळी पर्यत ‘जनता कफ्यरू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करावे असे आवाहन काचुरवाहीचे सरपंच शैलेश राऊत यांनी केले .
गेल्या काही दिवसांत सर्व ग्रामपंचायत सदस्या सोबत बैठक पार पङली. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्य़ासह तालुका आणि गावखेळ्तातील कोरोनाच्या बिघडलेल्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व सदस्यांनी जनता कफ्यू लावावा अशी मागणी केली होती. ज्यामुळे कोरोना रोगाची साखळी तोडण्यात मदत होईल.
‘
या दरम्यान औषधी दुकान, दवाखाने, कुषी केद्र , दूध डेअरी , स्वत धान्य दुकान सोडून इतर सर्वप्रकारचे दुकान बंद राहतील. तसेच घर परिसरात चहा दुकान व खर्रा विक्री केल्यास दंडात्मक कार्यवाही किवा गोपनीय पध्दतीने पोलिस कारवाई करण्यात येईल तसेच मास्कचा वापर करावा. असे आवाहन गट ग्राम पंचायत काचुरवाही चे सरपंच शैलेश राऊत यानी केले आहे.
काचुरवाहीत सोम,मंगल,बुधवार जनता कफ्यू चे आवाहन -सरपंच
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/36evTyO
via
No comments