ना ढोल ना डी जे कोविड19च्या गाईड नुसानुसार गणपती बाप्पा चे झाले विसरर्जन.
नगरपरिषद व पोलिस प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती चोख व्यवस्था.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पांचे केले घरच्या घरीच विसर्जन.
रामटेक : गणेशोत्सवात भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहचलेला असतो. पण विसर्जनाच्या दिवशी अत्यंत जड अंतकरणाने भाविक आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असतात.
दरवर्षी मोठ्या मिरवणुका काढून बाप्पांना निरोप दिला जातो. मात्र, यंदा कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता विसर्जन मिरवणुकांवर देखील बंधनं घालण्यात आली होती पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे मार्गदर्शनात राखी तलाव व रमालेश्र्वर तलाव येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता प्रशासनाने देखील अत्यंत काळजी घेत विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली.नगर परिषद उपाध्यक्ष आलोक मानकर रामटेक पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर ह्यावेळी भाविकांच्या मदतीला समोर आले.
“रामटेक शहरातील राखी तलाव तसेच रमाळेश्र्वर तलाव येथे फक्त दोन लोकांना विसर्जनाची परवानगी दिली होती . शक्यतो नागरिकांनी घरच्या घरीच बाप्पांचे विसर्जन करावे आणि मिरवणूक काढू नये जेणेकरून गर्दी होणार नाही.
नगर परिषद तसेच रामटेक पोलीस प्रशासन च्या मार्फत विसर्जनासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. व जनतेने त्याचा उदंड प्रतिसाद दिला.
पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत हत्ती मारे, बारंगे ,राऊत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नगर परिषद चे अधिकारी राजेश सव्वालाखे ,गोविंद तूप ट कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे शक्यतो घरच्या घरीच बाप्पांचे विसर्जन करा असे आवाहन करण्यात आले होते. तसेच नगरपरिषद मार्फत रामटेक शहरात कृत्रिम तलाव, ब्यारिकेट्स यांची व्यवस्था करण्यात आली होती .
काही ठीकाणी भाविकांनी आपल्या घरीच गणपती बाप्पांचे विसर्जन केले तर काही नागरिकांनी राखी तलाव येथे नगरपरिषद मार्फत केलेले कृत्रिम तलावात तर काहींनी रामालेश्र्वर तलाव येथे असलेले कृत्रिम तलावात सोशल डीस्टांसिग चे पालन करून
विसर्जन केले.
काही भाविकांनी घरच्या घरीच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात गणपती बाप्पांचे विसर्जन केले..
बच्चे कंपनिने गणपती बाप्पा चालले म्हणून दुःख व्यक्त केला. पण पुढच्या वर्षी मात्र लवकर या अशी प्रार्थना सुद्धा बच्चे कंपनी ने गणपती बाप्पांना केली.
ह्यावेळी संजय टेटे,धर्मेश भागलकर, राहुल ठाकूर,मनीष मर्जिवे,मिलिंद टेटे,निर्भय घाटोळे,संजय अावारी,राजेश साहू,आदी भाविकांनी बाप्पाला उत्साहात निरोप दिला.
ना ढोल ना डी जे कोविड19च्या गाईड नुसानुसार गणपती बाप्पा चे झाले विसरर्जन.
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3bjZDKO
via
No comments