Breaking News

हल्दीराम कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत कोरोनासंदर्भत आढावा बैठक

Nagpur Today : Nagpur News

कामठी :-कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना चा शोरकाव झाला असून ग्रामीण भागातील 90 टक्के कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही हल्दीराम कंपनीत काम करणाऱ्या मजूर वर्गातील आहे तेव्हा गुमथळा येथील हल्दीराम कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी तपासणी व्हावी तसेच यामध्ये पॉजोटिव्ह आलेल्या कामगारांना त्याच कंपनीत कोरोंनटाईन करण्यात यावे यादरम्यान कामगारांचा पगार न कापता त्यांचे पगार नियमित ठेवावे तसेच ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात आज आमदार टेकचंद सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली

.या बैठकीत झालेल्या समन्वय बैठकीत हल्दीराम कंपनीच्या समस्त कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी समर्थता दर्शवित कोरोनाची साखळी तोडण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले.

याप्रसंगी एसडीओ श्याम मंदनूरकर,तहसिलदार अरविंद हिंगे, माजी जी प अध्यक्ष निशा सावरकर, जी प चे विरोधी पक्ष नेता अनिल निधान, भाजप शहराध्यक्ष संजय कनोजिया , पंचायत समिती सभापतो उमेश रडके, जी प सदस्य मोहन माकडे यासह लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

हल्दीराम कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत कोरोनासंदर्भत आढावा बैठक



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2PIdr8d
via

No comments