प्रदेशाध्यक्ष यांनी पक्षाच्या बांधणीला दिले प्राधान्य,पक्षाच्या फ्रंटल व सेलच्या राज्यप्रमुखांच्या बैठका पार
– राष्ट्रवादीच्या फ्रंटल व सेलच्या राज्यप्रमुखांच्या मॅरेथॉन आढावा बैठकीचा तिसरा टप्पा पार,राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचीही उपस्थिती…
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कालपासून सुरू असलेल्या फ्रंटल व सेलच्या राज्यप्रमुखांच्या मॅरेथॉन बैठकीचा तिसरा टप्पा आज मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला.
अल्पसंख्याक सेल, लिगल सेल, वक्ता प्रशिक्षण सेल, ग्रंथालय सेल, भटक्या विमुक्त जाती व जमाती सेल, सहकार, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस या संघटनांच्या बैठका आज झाल्या.
राष्ट्रवादी अभिप्राय अभियानाची माहिती व संघटन बांधणीसाठी केलेल्या विविध उपक्रमांचा आढावादेखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.
यावेळी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. आशिष देशमुख , वक्ता प्रशिक्षण सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी या बैठकांमध्ये सादरीकरण केले.
याशिवाय मुंबई प्रदेश कार्यालयात फ्रंटल व सेल संघटनांच्या राज्यप्रमुखांशी सुरू असलेल्या बैठकांच्या शेवटच्या टप्प्यात ग्रंथालय सेल, भटक्या विमुक्त जाती व जमाती सेल, सहकार सेल या संघटनांच्या बैठका झाल्या.
या बैठकांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थितीत राहून सेलकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांचा आढावा प्रदेशाध्यक्षांसह यावेळी घेतला. ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, भटक्या विमुक्त जाती व जमाती सेलचे हिरालाल राठोड, सहकार सेलचे भारद्वाज पगारे या सेल प्रदेशाध्यक्षांनी सादरीकरण केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, बसवराज पाटील, नसीम सिद्धीकी, चिटणीस संजय बोरगे, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे हे पदाधिकारी उपस्थित होते.
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3lsW0ap
via
No comments