गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच करा!
नागपूर महानगरपालिकेचे आवाहन : दहाही झोनमध्ये १७६ कृत्रिम टँकची व्यवस्था
नागपूर : यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा न करण्याच्या आवाहनाला समस्त नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी जबाबदारीची भूमिका घेउन घरीच श्रीगणेशाची आराधना केली. आता श्री गणेशाच्या निरोपाची वेळ आली आहे. यापूर्वी केलेल्या आवाहनाप्रमाणे दीड दिवसाचे, पाच दिवसाचे आणि सात दिवसाचे गणपती विसर्जन अनेक नागरिकांनी घरीच केले. मनपाच्या कृत्रिम टँकवर येउन गर्दी करण्याऐवजी नागपूरकरांनी सामंजस्याची प्रचिती दिली. हा प्रतिसाद पुढेही कायम ठेवून आता दहा दिवसांच्या गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन सुद्धा घरीच करण्यात यावे. ज्यांना घरी विसर्जन शक्य नाही त्यांनी मनपाने व्यवस्था केलेल्या कृत्रिम टँकमध्ये कोव्हिड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करूनच विसर्जन करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
यावर्षी गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहरातील सर्वच तलाव बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी दहाही झोनमध्ये प्रभागनिहाय एकूण १७६ कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडण्याकडेच कटाक्षाने लक्ष द्यावे. बाहेर कृत्रिम टँकवर कोणत्याही प्रकारे विसर्जन स्थळी गर्दी होउ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक व ज्यांना घरी विसर्जन करणे किंवा कृत्रिम टँकपर्यंत जाणे शक्य नाही, अशांकरिता मनपाद्वारे ‘विसर्जन रथ’ची सुविधा करण्यात आली आहे.
यासाठी झोननिहाय संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. लक्ष्मीनगर झोन सचिन लोखंडे (७६२०१८७१०१), सुधीर अडकिने (७०५८५३६४२१), धरमपेठ झोन दीनदयाल टेंभेकर, झोनल अधिकारी (९८२३२४५६७१), हनुमाननगर झोन दिनेश कलोडे, झोनल अधिकारी (९८२३२४५६७३), नवीन मेश्राम (७०५७७३३२५५), धंतोली झोन धर्मेंद्र पाटील, झोनल अधिकारी (७८७५५५१८८३), लांजेवार (७५१७३६८६११), नेहरूनगर झोन विठोबा रामटेके, झोनल अधिकारी (९८२३३१३०६४), दहिवाले (९९६०७४०७६५), दिवाकर (९८२२९३८०१६), गांधीबाग झोन सरेश खरे, झोनल अधिकारी (९६३७०७३९८७), सतरंजीपुरा झोन प्रमोद आत्राम, झोनल अधिकारी (९८२३२४५६७९), नागपुरे (७०३०५७७६५०), लकडगंज झोन विनोद समर्थ (७७९८७३४३५५), आशीनगर झोन किशोर बागडे, झोनल अधिकारी (९८२३३१३१०२), अमर शेंडे (९०२२५७१८४९), दूरध्वनी-०७१२-२६५५६०५, मंगळवारी झोन महेश बोकारे, झोनल अधिकारी (९८२३२४५६७२),रमेश देशमुख (७०६६२६२३५४), नितीन गोरे (९८५०६६०५६६). नागरिकांनी त्यांच्या संबंधित झोनमधील क्रमांकावर फोन करून विसर्जन रथ बोलवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच करा!
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/31ID3bN
via
No comments