गणेशपेठ आगारातील कामगाराचा मृत्यू
– कोरोना बाधीत असल्याचा अहवाल, संपर्कात आलेल्या कर्मचारीयात धडकी
नागपूर- गणेशपेठ आगारातील एका कामगाराचा बुधवारी मृत्यू झाला. कोरोना बाधीत असल्याचा अहवाल असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाèयात भीती पसरली आहे.मागील काही दिवसांपासून ते आगारात येत नसल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनसार मृतक कर्मचारी नियमित कामावर येत होते. वर्कशॉपमध्ये काम असल्याने ते अनेक कर्मचारी यांच्या संपर्कात आल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगारात कोरोना संक्रमण पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अलिकडेच परिवहन व्यवस्था सुरू करण्यात आली. शासनाचे सर्व नियम पाळूनच प्रवाशांना परवानगी देण्यात आली. एका बस मध्ये मोजकेच म्हणजे २२ प्रवाशांना प्रवेश देण्यात येत आहे. मुखाच्छादन, निजंर्तुकीकरण आणि भौतिक दुरत्व ठेवूनच बसचे संचालन सुरू आहे. आता हळूहळू प्रवाशांची संख्या वाढायला लागली होती. त्यामुळे कर्मचाèयांची ड्युटीही नियमित होती. दरम्यान शिवशाही बसचे मेंटनंन्स करणारा एक पर्यवेक्षक गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. यानंतरही तो कामावर यायचा. प्रकृतीची काळजी घ्या, असा सल्ला कर्मचाèयांकडून त्यांना दिला जात होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत ते कामावर येत होते.
मंगळवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तपासणी केली असता कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला. बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. ही घटना परिवहन कार्यालयात वारयासारखी पसरली. आगारातील कामगारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान परिवहन प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून कार्यालय आणि परिसर निजंर्तुकीकरण करण्यात आले. तशी ही प्रक्रिया नियमीत सुरू होती.
कर्मचारी यांना तपासणीची सूचना
इमामवाडा आगारात ते काम करीत होते. मागील एक वर्षांपासून शिवशाही बसच्या दुरुस्तीसाठी गणेशपेठ आगारात कामाला होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाèयाना तपासणी करण्याच्या सूचना दिल्यात. असे परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी सांगितले.
गणेशपेठ आगारातील कामगाराचा मृत्यू
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3hyUPnd
via
No comments