Breaking News

पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी

Nagpur Today : Nagpur News

– पोहचविण्याचे कार्य बचाव पथकामार्फत सुरू

नागपूर : नागपूर जिल्हयात आज 81.43 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून नवेगांव खैरी व तोतलाडोह प्रकल्पाचे अनुक्रमे 16 व 14 दरवाजे उघडण्यात आले आहे. आज (दि.29 ऑगस्ट) रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नवेगांव खैरी प्रकल्पातून सरासरी 6839 क्युमेक व तोतलाडोह प्रकल्पातून 6693 क्युमेक पाण्याची विसर्ग होत असून एकूण 25 गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे 2 हजार 907 कुटुंबांतील 11 हजार 64 व्यक्ती बा‍धित झाले आहेत.

मौदा तालुक्यातील मौदा शहर, चेहाडी, सुखडी, नेरला, किरणापूर, कुंभारपूर, सिंगोरी, झुल्लर तसेच वडना ही 9 गावे बाधित झाली आहे. यापैकी 364 कुटुंबांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली आहे. 1 हजार 568 व्यक्तींना माथनी खाजगी शाळा, जनता हायस्कुल मौदा, ऑक्सफोर्ड स्कुल, जिल्हा परिषद शाळा व नरसाळा या सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच एसडीआरएफ (राज्य आपत्ती निवारण दल) व एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतीसाद दल) यांची सेवा घेण्यात आली आहे.

कामठी तालुक्यातील गोराबाजार, सोनेगांव, अजनी, भामेवाडा, जुनी कामठी, बिना, नेरी तसेच बिडबिना ही 8 गावे बाधित झाली आहे. गोराबाजार येथील 150 कुटुबांतील 620 व्यक्तींची सेंट जोसेफ शाळेत निवासाची व्यवस्था करण्यात आली. सोनेगाव येथील 80, अजनी 50, भामेवाडा 50, जुनी कामठी 40, बिडबिना 8 तर नेरी येथील 15 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बिना येथील 1 हजार 500 कुटुंबापैकी 250 ते 270 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येथे एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या मदतीने बचाव पथकाचे कार्य सुरू आहे.

पारशिवनी तालुक्यातील काळाफाटा, पिपरी, जुनी कामठी, सिंगारदिप, सालई मावली तसेच पाली ही 6 गावे बाधित आहेत. येथील 380 कुटुंबातील 1 हजार 574 बाधित नागरिकांचे शाळा व समाजभवन येथे स्थलांतरण करण्यात आले आहे.

कुही तालुक्यातील चिचघाट तसेच आवरमारा या 2 गावातील 270 कुटुंब बाधित आहे. त्यापैकी 200 कुटुबांतील 1 हजार व्यक्तींना आतापर्यत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. उर्वरित कुटुबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम बचाव पथकामार्फत वेगाने सुरू आहे. एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या सेवेसह आर्मीचे पथक बचाव कार्य करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3hIN3qR
via

No comments