आदिवासी क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यास प्राधान्य : नितीन गडकरी
म.प्र. आदिवासी समाजाशी ई संवाद
एमएसएमईतील योजनांचा लाभ घ्या
मध-उद्योगाचा विकास अधिक व्हावा
नागपूर: आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या आदिवासी-वनवासी क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्यास प्राधान्य मिळावे, या दृष्टीने या क्षेत्राचा विकास करणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मध्यप्रदेश आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी यांनी संवाद साधला. राष्ट्राच्या सर्वांगीण विकास आणि उन्नतीसाठी आपण काम करीत असल्याचे सांगून ना. गडकरी यांनी सांगितले की, आदिवासी भाग सुखी, संपन्न व शक्तिशाली बनवण्याचा आपला उद्देश आहे. त्यासाठ़ी विविध योजनांची या भागात अमलबजावणी होणे आणि जंगल क्षेत्रातील कच्च्या मालाचा वापर करून उद्योग निर्माण व्हावे.
त्यातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपल्या क्षेत्राची क्षमता काय आहे, याची माहिती आपल्याला आहे. त्यानुसार आपल्या क्षेत्राचा विकास झाला तरच फायदेकारक ठरेल. आदिवासी क्षेत्रात मध उत्पादन अधिक होते. साखरेऐवजी मधाचा वापर करण्याचा प्रचार आपण करावा. मधापासून चांगल्या दर्जाचे बिस्किट, चॉकलेट बनवता येतील का याचा प्रयत्न करावा. खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून आपल्याला हा उद्योग करता येईल, असेही ते म्हणाले.
ताडीमाडी क्लस्टर तयार करून नीरा एकत्र करून ती विकण्याचे कामही खादी ग्रामोद्योगमार्फत होऊ शकेल, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले- जंगल क्षेत्रात आयुर्वेदिक औषधीची झाडे आहेत. आयुर्वेदिक औषधी कंपनींना या औषधाचा पुरवठा करणे. अगरबत्ती उद्योग येथे होऊ शकतो. आम्ही त्यासाठी मशीन देत आहोत. आदिवासी क्षेत्रात मशीन दिली तर रोजगार निर्माण होईल. तसेच जंगल क्षेत्रातील अखाद्य तेलबियांचा उपयोग करून जैविक इंधन बनविणे शक्य झाले आहे. जैविक इंधन हे डिझेल पेट्रोलसाठ़ी पर्याय निर्माण झाले आहे. कच्चा माल कोणता आपल्या क्षेत्रात उपलब्ध आहे व त्यापासून आपण बाजारात कोणत्या वस्तू आणू शकतो याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, असेही ते म्हणाले.
केंद्र शासनाच्या आदिवासी समाजासाठी असलेल्या योजनांचा अभ्यास करावा व त्याचा लाभ आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी घ्यावा असे आवाहनही ना. गडकरी यांनी केले.
आदिवासी क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यास प्राधान्य : नितीन गडकरी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/31Mdrvb
via
No comments