Breaking News

‘इमिटेशन ज्वेलरी’ उद्योगांनी एमएसएमईत यावे : नितीन गडकरी

Nagpur Today : Nagpur News

‘इमिटेशन ज्वेलरी’ निर्माण उद्योजकांशी ई संवाद

नागपूर: ‘इमिटेशन ज्वेलरी’ उद्योगांनी एमएसएमईमध्ये नोंदणी करून या विभागात यावे. या उद्योगांच्या क्लस्टरसाठी आम्ही राष्ट्रीय महामार्गाशेजारी जागा उपलब्ध करून देऊ. एमएसएमई स्टॉक ÷एक्स्चेंजअंतर्गत येणार्‍या उद्योगांना परकीय गुंतवणूकही उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘इमिटेशन ज्वेलरी’ निर्माता उद्योजकांशी गडकरी व्हिडिओ कॉन्सफरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. या उद्योगातील शेकडो उद्योजक यावेळी ऑनलाईन उपस्थित होते. आज या उद्योगांना लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केला जातो. ती आयात बंद व्हावी किंवा कमी व्हावी अशी मागणी या उद्योजकांनी यावेळी केली. यावर ना. गडकरी यांनी आपण निवेदन द्यावे मी कच्च्या मालावर आयात शुल्क लावण्याबाबत वाणिज्य मंत्रालयाकडे प्रयत्न करीन असे सांगितले.

एमएसएमईच्या स्फूर्ती योजनेत आम्ही उद्योगांचे लहान क्लस्टर तयार करीत आहोत. या योजनेत इमिटेशन ज्वेलरी उद्योजकांनी नोंदणी करून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन ना. गडकरी यांनी यावेळी केले. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी सांगितले की, आपल्या क्षेत्रात गेल्या 10 वर्षापासून दागिने तयार करणार्‍या एका व्यक्तीला ‘मास्टर ट्रेनर’ बनवा व त्याच्याकडून 10-10 कौशल्यप्राप्त कारागिर तयार करा. संशोधन, ÷उच्च तंत्रज्ञान, कौशल्य, नवीन मशिनरी, नवीन संशोधन याद्वारे उत्पादित वस्तूची किंमत की करणे शक्य होईल. एमएसएमईच्या फंडस ऑफ फंडस योजनेत आम्ही ज्या उद्योगांचा जीएसटी रेकॉर्ड, आयकर व बँक रेकॉर्ड चांगला आहे, अशा उद्योगांचे रेटिंग करून त्यांना एमएसएमई स्टॉक एक्स्चेंजमध्ये घेणार आहोत. यातून त्यांना परकीय भागभांडवल उपलब्ध होईल. परकीय गुंतवणूक एमएसएमईतही येईल

कोरोनामुळे आज सर्व जग अडचणीत आहे. आपल्या देशातही प्रत्येक क्षेत्रावर कोरोनाचा विपरित परिणाम झाला आहे. पण सर्व प्रकारच्या संकटांमधून मार्ग काढण्याचे आपले कसब आहे. या संकटावरही मात करून आम्ही कोरोनाची व आर्थिक अशा दोन्ही लढाया जिंकू असा विश्वासही ना. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

‘इमिटेशन ज्वेलरी’ उद्योगांनी एमएसएमईत यावे : नितीन गडकरी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3go9PmZ
via

No comments