लहान उद्योगांना कर्जपुरवठ्यासाठी सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्था निर्माण व्हाव्यात : नितीन गडकरी
उत्तर भारतीय चार्टर्ड अक़ौंटंटशी ई संवाद
नागपूर: आर्थिक आणि सामाजिक मागासलेल्या क्षेत्रातील अत्यंत लहान लहान उद्योगांना कर्जपुरवठा करून आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्था निर्माण व्हाव्यात. त्यामुळे या उद्योगांना 10 लाखांपर्यंत कर्जपुरवठा शक्य होईल व या क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आपण यासाठी प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
उत्तर भारतीय चार्टर्ड अकाऊंटंटशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी सांगितले की, कोविड-19 मुळे मोठे संकट अर्थव्यवस्थेवर व समाजमनावर आले आहे. समाजात भीती, नैराश्य पसरले आहे. नैराश्याच्या गर्तेतून समाजाला बाहेर काढणे आपली जबाबादारी आहे. सर्वांनी मिळून आत्मविश्वास जागवला पाहिजे. आजपर्यंत देशाने अनेक संकटांवर मात केली आहे. नैसर्गिक संकटांचा आणि नक्षलवाद व दहशतवादी कारवाया अशा संकटांचाही मात केली आहे. या संकटामुळे आर्थिक व्यवस्था पुढे नेण्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे.
हे दीर्घ काळ चालणारे संकट असल्यामुळे यासोबत जीवन जगण्याची पध्दती आत्मसात करावी लागणार आहे. अशा स्थितीतच मागास व अविकसित असलेल्या कृषी, ग्रामीण व आदिवासी भागातील भाजीवाले, फेरीवाले, चर्मकार, दूध विक्रेते अशा लहान लहान व्यावसायिकांना सूक्ष्म आर्थिक साह्य उपलब्ध झाले पाहिजे. त्यामुळे रोजगार निर्माण होणार आहे. या संदर्भात अनेक तज्ञांशी आपली चर्चा झाली असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.
या लहान व्यावसायिकांना 5 ते 10 लाखांपर्यंत कर्जाचीच आवश्यकता असते, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- या उद्योगांना कर्जपुरवठा व्हावा म्हणून सामाजिक वित्तीय संस्था सु़रु करण्याचे आपले प्रयत्न आहेत. या संस्थांना रिझव़्र्ह बँकेने परवाना द्यावा. प्रत्येक शहरातील एका चार्टर्ड अकाऊंटंटकडे या संस्थांवर नियंत्रणाची जबाबदारी देण्यात यावी. ज्या संस्थांचे काम चांगले आहे, त्या संस्थांना 10 लाखांपेक्षा अधिक कर्जपुरवठा करण्याची परवानगी भविष्यात देता येईल. लहान व्यावसायिक व उद्योगांना सध्याच्या काळात कर्जपुरवठा झाला तरच सामााजिक आर्थिकदृष्ट्या मागास कृषी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील उद्योग सुरु होऊन रोजगार निर्माण होेईल. मागास भागातील गरीब जनतेचे वैयक्तिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही ना. गडकरी म्हणाले.
भारत आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाला आत्मनिर्भर व्हावे लागेल. इतरांवर अवलंबून राहण्याची स्थिती बदलावी लागेल, असे सांगताना ना. गडकरी यांनी उच्च तंत्रज्ञान, कौशल्य विकास, नवीन संसोधन, मोठी बाजारपेठ या देशात आहे. आता उद्योगांमध्ये परकीय गुंतवणूक आली तर देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. भारतात परकीय गुंतवणुकीसाठी सध्या योग्य वेळ आहे. कारण या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो, याकडेही ना. गडकरींनी लक्ष वेधले.
लहान उद्योगांना कर्जपुरवठ्यासाठी सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्था निर्माण व्हाव्यात : नितीन गडकरी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2El2Z3T
via
No comments