Breaking News

रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग क्षेत्र महत्त्वाचे : नितीन गडकरी

Nagpur Today : Nagpur News

रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग व्यापारी असो.शी संवाद

नागपूर: सध्याच्या जीवनात रेफ्रीजरेशन आणि एअर कंडशनिंग व्यवसाय महत्त्वाची भमिका बजावत आहे. सर्वच क्षेत्रात या वस्तूंची गरज निर्माण झाली आहे. औषध क्षेत्र, दूध क्षेत्र, भाजीपाला, कोल्ड स्टोरेज अशा क्षेत्रात रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग उद्योग महत्त्वाचा ठरला आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- संपूर्ण जगच कोरोनाच्या विळख्यात आहे. अर्थव्यवस्थेसमोरही अनेक प्रकारची संकटे निर्माण झाली आहेत. व्यापारी, उद्योजक, वित्तीय संस्था, बँका सर्वांसमोर कोरोनाचे संकट उभे आहे आणि सर्वच जण याचा सामना करीत आहेत. अशा स्थितीत सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने आपल्याला पुढे जायचे आहे आणि अर्थव्यवस्थेला पुढे न्यायचे आहे. लोकांच्या मनात असलेली भीती आणि नैराश्य दूर सारण्यास मदत करायची आहे. पुन्हा एकदा जाोमाने उभे राहायचे आहे. शासन आपल्या पाठीशी आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कोरोनासारख्या संकटातून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांसमोर अडचणी सोडविण्यासाठी शासनाने एमएसएमई मार्फत 3 लाख कोटींचे पॅकेज दिले आहे. याचा फायदा या उद्योगांना होत असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- समाधानकारक प्रगती असलेल्या उद्योगांना उद्योगासाठी भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून आम्ही एमएसएमई स्टॉक एक्स्चेेंची कल्पना आणली. या संकल्पनेतून उद्योगांना शेअर बाजारातून भांडवल उभे करता येईल.

एअर कंडीशनिंगसाठी ऊर्जा भरपूर लागते. या खर्चात कशी बचत करता येईल, यासाठ़ी या व्यावसायिकांनी प्रयत्न करावा. या व्यवसात पुढे जाण्याच्या खूप क्षमता आहे. त्या क्षमतांचा उपयोग करून भारतीय अर्थव्यवस्थेला साह्य करावे, असे आवाहनही ना. गडकरी यांनी यावेळी केले.

रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग क्षेत्र महत्त्वाचे : नितीन गडकरी



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/30OONrz
via

No comments