Breaking News

जिल्हयातील आणखी सात जणांची कोरोनावर मात

Nagpur Today : Nagpur News

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत दवाखान्यातून घराकडे रवानगी

गडचिरोली : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जिल्हयातील आणखी सात कोविड-19 बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर दवाखान्यातून घरी सोडण्यात आले.

यावेळी टाळयांच्या गजरात त्यांना सर्व उपस्थितांनी प्रोत्साहन दिले. घरी सोडण्यात आलेले सातही जण एटापल्ली तालुक्यातील आहेत. आज सात जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे जिल्हयातील एकुण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १९ झाली. तर सद्या १९ कोरोना बाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

एक जणाचा यापुर्वी १ जून रोजी हैद्राबाद येथे कोरोना निदान व दुदैवी मृत्यू झाला आहे. सात जणांना दवाखान्यातून डीस्चार्ज देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री उपस्थित होते.

जिल्हयातील आणखी सात जणांची कोरोनावर मात



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3049OQg
via

No comments