कामठीत अजून चार सैनिक निघाले कोरोना पॉजिटिव्ह
कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत असली तरी लॉकडाउन 1 लागू झाल्या पासून बाहेरुन येणाऱ्याची संख्या ही दिवसेंदिवस वाढीवर असल्याने विविध भागातून आलेले रिटर्न नागरिक हे कोरोनाबधित आढळून आल्याने तालुक्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही वाढीवर आहे.यानुसार काल कामठी कॅन्टोमेंट हद्दीत येणाऱ्या उंटखाना ला लागून असलेल्या सैन्य फायरिंग रेंज मध्ये कार्यरत असलेला एक 32 वर्षोय सैनिक कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याचे निष्पन्न झाल्यानन्तर याच्या सोबतीला असलेल्या व प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या पाच सैनिकांना कामठी च्या मिलिटरी हॉस्पिटल मध्ये कोरोन्टीन करीत या पाचही सैनिकांचे ठस्याचे नमुने घेत कोरोना पोजिटिव्ह ची चाचणी करण्यात आली होती या चाचणी चे अहवाल आल्यानुसार या पाच सैनिकांपैकी चार सैनिकांचे कोरोना अहवाल पोजिटिव्ह आले
सैन्य विभागाच्या फायरिंग रेंज मध्ये आढळलेला कोरोनाबधित हा सैनिक नुकतेच काही दिवसांपूर्वी पुणे जिल्यातील तुर्की वरून विभागोय कामकाज आटोपून इतर पाच लोकांसह शास्कोय वाहनाने कामठी कॅन्टोमेंट परिसरात आले असता या सहाही सैनिकांना काळजी घेण्याच्या उद्देशाने एका विशेष खोलीत मागिल चार दिवसांपासून कोरोनटाईन करण्यात आले होते या सहा मधून एका सैनिकाला कोरोनाचे लक्षण काल 25 जून ला आढळताच त्वरित त्याची कामठी मिलिटरी हॉस्पिटल येथे नेऊन कोरोनाची तपासणी केली असता रिपोर्ट अहवाल हा पॉजिटीव आले असता त्याला पुढील उपचारार्थ कामठी मिलिटरी हॉस्पिटल च्या कोविड सेंटर मधील विलीगिकरन कक्षात सुरक्षित ठेवण्यात आले आहे तसेच सोबत असलेल्या त्या ।पाच सैनिकांचे सुद्धा घश्याचे नमुने घेण्यात आले असून यांना सुदधा कामठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते या पाच सैनिकांचे अहवाल आज आले असता यातील चार सैनिकांचे अहवाल पॉजिटिव्ह आले.
कामठी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंत ची आकडेवारी बघितली असता एकूण 21 रुग्ण हे कोरोना बाधित आढळले त्यातील 12 रुग्ण हे बरे होऊन स्वगृही परतले आहेत तर यातील 9 रुग्ण हे कोरोनाबधित आहेत तर आज चार सैनिकांचे कोरोना नमुने चा अहवाल पोजिटिव्ह आले यानुसार कामठी तील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 13 झाली आहे.
ज्यामध्ये महादुला चा एक, कवठा येथील 1, येरखेडा ग्रा प हद्दीतील रामकृष्ण सोसायटी व भूषण नगर येथील प्रत्येकी 1, खैरी गावातील 3 मजूर, गांधीनगर कामठी चा 1 तसेच छावणी परिषद हद्दीतील पाच सैनिक चा समावेश आहे तर यांच्या प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या 43 लोकांना संस्थात्मक विलीगिकरण करण्यात आले तसेच खबरदारी घेण्याच्या उद्देशातून 360 च्या वर नागरिक गृह विलीगिकरन आहेत.
संदीप कांबळे कामठी
कामठीत अजून चार सैनिक निघाले कोरोना पॉजिटिव्ह
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2CLjkOG
via
No comments