Breaking News

रामटेक येथे रस्ता अपघातात महिला जागीच ठार

Nagpur Today : Nagpur News

रामटेक: रामटेक तुमसर राज्य महामार्गाचे सिमेंट बांधकाम सुरू असून या रस्त्याला अपघाताचे ग्रहण लागले आहे.आज साडेचारच्या दरम्यान सूर्या हॉटेल जवळील रस्त्यावर ट्रक अपघातात मंगला कैलास बर्वे (वय 48 वर्ष)यांचे जागीच ठार झाल्या.

तर त्यांच्या सहकारी ज्योती कांबळे ( वय42वर्ष) ह्या रस्त्याच्या कडेला पडल्याने त्यांना अंगाला खरचटले व किरकोळ इजा झाली.आपली नोकरी आटोपून दोघीही रामटेकला येत असताना मिक्सर ट्रकने मागील भागाने धडक दिल्याने हा अपघात घडून आला. अपघात इतका भयानक होता की मृतक महिलेच्या डोक्याचा भाग मागील चाकात सापडल्याने चेंदामेंदा होऊन ती जागीच गतप्राण झाली.-

गेल्या बावीस वर्षांपासून त्या एकवीरा मतिमंद मुलांचे बालगृह काचूरवाही येथे कार्यरत होत्या.दररोज त्या लहान गडपायरी रामटेक येथून गांधी वॉर्ड रामटेक येथील आपली सहकारी ज्योती कांबळे यांच्या स्कुटी क्रमांक MH 31 FK 1730 ने शाळेत जात होत्या.

आपली ड्युटी करून घरी येत असताना बारब्रिक कंपनीच्या मिक्सर मशीन ट्रक क्रमांक CG 04 JD 4471 ने त्यांना धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सहकारी पोलीस व शिपायांसह घटनास्थळी दाखल झाले.मिक्सर ट्रकचालकाविरुद्ध 279,304(अ)भादवी सहकलम 184 एमव्ही ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे व सहकारी पोलीस करीत आहेत.

-त्यांना ऑटो चालक पती दोन मुलं व एक मुलगी आहे.त्यांच्या अचानक अपघाती जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रामटेक येथे रस्ता अपघातात महिला जागीच ठार



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/3erTGfS
via

No comments