Breaking News

मंत्री केदार साहेब ,कामठी तालुका अर्धवट क्रीडा संकुलाचा प्रश्न केव्हा मार्गी लागणार?

Nagpur Today : Nagpur News

16 वर्षे लोटूनही तालुका क्रीडा संकुल पूर्णत्वास न आल्याने क्रीडा प्रेमींची अजूनही उपेक्षाच

कामठी :-ग्रामीण भागात राहणाऱ्या मजबूत आणि दणकट बांध्याच युवा तरुण पिढीमध्ये विविध राष्ट्रीय मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने तत्कालीन राज्य शासनाच्या क्रीडा विभागातर्फे 2004 मध्ये तालुकास्तरावर सर्वसोयी असलेले लाखो रुपये खर्चाचे क्रीडा संकुल बांधून घेण्याच्या निर्णयानुसार माजी राज्यमंत्री एड सुलेखा कुंभारे यांच्या कार्यकाळात कामठी येथील रुईगंज मैदानात 13 एप्रिल 2004 रोजी खनिकर्म विभागाच्या वतीने 65 लक्ष रुपये मंजूर निधीसह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, माजी पालकमंत्री ना.सतिशबाबू चतुर्वेदी व माजी राज्यमंत्री ना.एड सुलेखाताई कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत मोठ्या थाटामाटात 65 लक्ष रुपयाच्या क्रीडा स्टेडियम चे भूमिपूजन कारण्यात आले होते व या क्रीडा संकुलासाठी ऐन मोक्याच्या ठिकाणच्या जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल नजीकच्या बाजूची प्रशस्त जागा उपलब्ध करून बांधकामास सुरुवातही करण्यात आली होती तर यातील 45 लक्ष रुपये इतके अनुदान संकुल समितीस वितरित सुद्धा केले होते परंतु बांधकामासाठी खाजगी कंत्राटदाराला बांधकाम साहित्य व खर्चातील दरवाढीमुळे क्रीडा मंत्रालयाच्या विरुद्ध कोर्टात अर्ज दाखल करून क्रीडा संकुलाचे अर्धवट काम सोडून गेल्याने हे क्रीडा संकुल फक्त शोभेची वस्तू ठरत असून हे अर्धवट काम अजूनही रखडलेले आहे तर या सर्व प्रकारात रखडलेल्या तालुका क्रीडा संकुल ला पुनर्बांधणी न करता उलट शहरापासून दूर ग्रामीण भागात जिल्हा क्रीडा संकुल चे बांधकाम उभारल्याने तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर 65 लक्ष रुप्यापैकी संकुल समितीस वितरित करण्यात आलेला 45 लक्ष रुपये निधी हा व्यर्थ ठरला आहे तर या सर्व प्रकारात राजकीय पदाधिकारीच्य मनमानी कारभारामुळे शासकीय निधीचा सर्रास सत्यानाश झाला तर दुसरीकडे या शहरातील क्रीडाप्रेमींची सर्रास चेष्टा करण्यात आली आहे तेव्हा सर्वसामान्यांची सरकार म्हणून उदयास आलेली महाविकास आघाडी सरकार चे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना सुनीलबाबू केदार साहेब या रखडलेल्या अर्धवट तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागणार का?असा सवाल येथील जागरूक क्रीडा युवक वर्ग करीत आहे.

कामठी शहरातून सर्व क्षेत्रापैकी क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास निदर्शनास येईल की क्रिकेटचे नामवंत महान खेळांडु सी के नायडू यांचे जन्मस्थान कामठी तसेच येथील छावणी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रब्बानी मैदानावरच प्रशिक्षण पूर्ण करून विदेशात फुटबॉल खेळाची धूम मचविणारा स्व.मुश्ताक पठाण यांनी सुद्धा कामठी शहराचे नाव लौकिक केले तसेच काही काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबाल स्पर्धेत कामठीतिल न्यू ग्लोब क्लबच्या खेळाडूंनी जोरदार विजय प्राप्त केला होता या संघाचे प्रशिक्षक कोच कामठी चे श्यामलाल घोष यांच्यासारख्या महत्वपूर्ण खेळाडूंनी या शहरात राहून जीवनातील क्रीडा क्षेत्रात विजय प्राप्त केला आहे.मात्र आज या शहरात क्रीडा संकुला अभावी खेळाडूंची गोची होत आहे तर ग्रामीण भागात उभारण्यात येत असलेले जिल्हा क्रीडा संकुल हे सोयीचे होणार नसल्याचे चर्चित आहे तर शहरातील अर्धवट क्रीडा संकुलातच क्रीडा संकुल उभारण्याची मागणी जोर धरत आहे.

कामठी शहरात रब्बानी क्लब, यंगस्टर, न्यू ग्लोब क्लब, क्रिकेट क्लब, कबड्डी क्लब आदी खेळाडूंचे क्लब आहेत .खेळाडूंसाठी योग्य ती खेळण्याची सोय नासल्यामुळे काही खेळ हे लयास गेले आहेत .ब्रिटिशांच्या काळात आणि नंतर विदेशातही झालेल्या ओलांपिक खेळात आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळाच्या स्पर्धेत येथील खेळाडूंनी नाव कमावून या शहराला अग्रिम गौरवाचे स्थान प्राप्त करून दिले आहे.मात्र दुर्दैवाने क्रीडा संकुल अभावी येथील खेळाडूंची मोठी गोचो होत आहे .

-बॉक्स:-2004 पासून अर्धवट रखडलेला तालुका क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वास नेण्याकडे तत्कालीन राजकीय नेत्यांनी कधीच लक्ष पुरविले नाही तर उलट 29 मार्च 2016 पासून शहरापासून 10 की मी दूर अंतरावरील गादा गावात24 कोटी रुपयांचा निधी देऊन जिल्हा क्रीडा संकुल तसेच फुटबॉल ग्राउंड उभारणीचे काम सुरू केले हे काम पूर्ण करण्याचा कालावधी हा तीन वर्षांचा होता मात्र आज 4 वर्षाचा काळ लोटला तरी या बांधकामाला पूर्णत्वाचे रूप येणे बाकीच आहे. तेव्हा याकडे ही लक्ष पुरविणे गरजेचे आहे

संदीप कांबळे कामठी

मंत्री केदार साहेब ,कामठी तालुका अर्धवट क्रीडा संकुलाचा प्रश्न केव्हा मार्गी लागणार?



from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2YwbhO6
via

No comments