रामटेक येथे शूर भारतीय सैनिकांना र्शद्धांजली व चिनी वस्तूंवर बहिष्कार
स्वदेशी जागरण मंच व भाजपा रामटेकच्या वतीने चीनने केलेल्या हल्याचा निषेध

रामटेक: स्वदेशी जागरण मंच व भाजपा रामटेकच्या वतीने टी-पॉईंट शीतलवाडी येथे पूर्व लडाखच्या गलवान घाटीत चिनी सैन्याबरोबर उसळलेल्या संघर्षात शहीद झालेल्या एका लष्करी अधिकार्यासह वीस जवानांना र्शद्धांजली अर्पण करण्यात आली.
संपूर्ण जगासह भारत कोरोनाशी लढत असताना चीनने केलेल्या हल्याचा निषेध म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून त्यांची होळी करण्यात आली.
कोणीही चिनी वस्तू वापरू नये, त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा आणि प्रत्येक दैनंदिन, गरजेची अत्यावश्यक वस्तू आपल्याच देशात तयार करण्यात यावी, असेही विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष नरेंद्र बंधाटे, बाजार समिती रामटेकचे माजी सभापती अनिल कोल्हे, चरणसिंग यादव, संदीप उरकुडे,डॉ. विशाल कामदार, राजेश जयस्वाल, चंद्रमणी धमगाये, नंदकिशोर कोहळे, अनिता दियेवार, धनंजय तरारे, सुधीर लेंडे यांच्यासह मोठय़ा संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
रामटेक येथे शूर भारतीय सैनिकांना र्शद्धांजली व चिनी वस्तूंवर बहिष्कार
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/30ZK5sB
via
No comments