कामठीत आज पुन्हा सहा सैनिक आढळले कोरोना पॉझिटिव्ह
कामठी:-कामठी छावणी परिषद हद्दीत येणाऱ्या उंटखाना परिसरातील सैनिक फायरिंग रेंज परिसरात आज पुन्हा सहा सैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सैनिक प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडाली आहे तर या सहाही कोरोना पॉझिटिव्ह सैनिकानवर कामठी मिल्ट्री रूग्णालयात उपचार सुरू आहेत काल 28 जून ला कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला सैनिक हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशाखापटनम येथून सैनिक प्रशिक्षण आटोपून कामठी येथील उंटखाना परिसरातील फायरिंग रेंज सैनिक प्रशिक्षण केंद्रात परत आला होता
त्याला सैनिक प्रशासणाच्या वतीने 14 दिवस तेथील विशेष गृहात कॉरोनटाईन करण्यात आले होते तसेच याच्या संपर्कात आलेल्या व अति जोखीम असलेले तसेच सैनिक प्रशिक्षण केंद्रातील ब्र्याक (निवासस्थान)परिसरातील सहा सैनिकाची 28 जूनला मिल्ट्री रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता त्याचा चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आढळून आला आहे या साहाही कोरोना बांधीत सैनिकांना उपचारासाठी मिलिटरी रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत कोरणा बाधित सैनिकांची संख्या 12 झाल्याने मिल्ट्री प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडाली आहे.
काल वारीसपुरा येथील एकाच कुटूंबातील तीन सदस्य कोरोनाचे पॉझिटिव्ह मिळाले असून त्याच्या संपर्कात वारीसपूरा कामठी येथील 5 नागरिक आल्याने त्याना तहसील प्रशासणाचे वतीने वारेगाव येथील कॉरोंटाईन सेंटर मध्ये विलगिकरन करण्यात आले आहेत
कामठी मिलिटरी हॉस्पिटल मधील कोविड सेंटर मध्ये एकूण 21 कोरोना बाधित रुग्ण हे उपचार घेत आहेत ज्यामध्ये वायुसेना नगर नागपूर चे 8 , आयुध निर्मानी चांदा चे 1 तर कामठी येथील फायरिंग रेंजचेच 12 सैनिकांचा समावेश आहे तर या फायरिंग रेंज मधील 33 सैनिकांना कोरोनटाईन करण्यात आले आहे तसेच एकूण 21 कोरोनाबधित रुग्णा मधून वायुसेना नगर चे 2 रुग्ण हे बरे झाल्याने कामठी मिलिटरी हॉस्पिटल च्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 19 आहे ज्यामध्ये कामठी तील सैनिकांचीच संख्या ही 12 आहे.
बॉक्स:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या शहर तसेच ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही 23 असून यातील 16 रुग्ण हे बरे होऊन घरी परतल्याने सध्यस्थीतीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 7 आहे.ज्यामध्ये वारीसपुरा कामठी चे 3, गांधीनगर कामठी चे 1 भूषणनगर चे 1, येरखेडा चे 1, तसेच गोविंदगढ कवठा चे 1 चा समावेश आहे तसेच बरे होऊन घरी परतलेल्या 16 मध्ये खैरी चे 3, लुंबिनिंनगर कामठी चे 2, भिलगावं 1, मेन रोड कामठी चे 3, महादुला 6 , नांदा कोराडी 1 व खैरी च्या 3 लोकांचा समावेश आहे
कामठीत आज पुन्हा सहा सैनिक आढळले कोरोना पॉझिटिव्ह
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/38hZshU
via
No comments