नागपूरमध्ये पोलिसांची जीप उलटून एक ठार; चौघे जखमी
नागपूर: कालमध्यरात्री बुटीबोरी पोलिसांची जीप उलटून झालेल्या अपघतात एक पोलीस ठार झाला असून चौघेजण जखमी झाले आहेत. रात्रीच्यावेळी जीपसमोर एक डुक्कर आले होते. त्याला वाचवताना हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
जामठा येथे काल मध्यरात्री १२ वाजता घडली. बुटीबोरी पोलीस ठाण्याचे पोलीस महिला पोलीस शिपाई छाया धोपटे यांना सोडण्यासाठी खापरखेडा येथे एमएच-३१-डीझेड- ०३६४ या क्रमांकाच्या जीपने जात होते. यावेळी जामठा भागात डुक्कर आडवे आल्याने चालक खुशाल गुलाबराव शेगोकर यांचे जीपवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे जीप बाजूलाच असलेल्या नाल्यात उलटली. या अपघतात शेगोकर यांचा मृत्यू झाला. तर महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात, हेडकॉन्स्टेबल साजिद सय्यद, महिला पोलिस शिपाई हर्षा शेंडे व छाया धोपटे या अपघातात जखमी झाले.
या अपघताची माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ऑरेंजसिटी पोलीस ठाण्यात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी शेगोकर यांना मृत घोषित केले. तर जखमींवर तात्काळ उपचार सुरू केले असून जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं. हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.
नागपूरमध्ये पोलिसांची जीप उलटून एक ठार; चौघे जखमी
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2xszeLq
via
No comments