कन्हान च्या बारची विदेशी दारू चोरी पकडली
नऊ हजाराच्या दारूसह एक आरोपी व दोन नाबालिक ताब्यात
कन्हान : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील आंबेडकर चौक कन्हान येथील बार मधिल चोरी प्रकरणी एक आरोपी व दोन विधी संघर्षग्रस्त बालकास पोलीसा नी ताब्यात घेऊन त्यांचे जवळुन चोरले ली एक बीयर पेटी व एक विदेशी दारू ची पेटी सहीत एकुण ९ हजार रूपयाची दारू जप्त केली.
कन्हान पोलीस स्टेशन पासुन एक कि. मी. लांब नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामा र्गावरील आंबेडकर चौक जवळील गौरव बीयर बार मध्ये दि.२२ ते दि.२८ एप्रिल दरम्यान मागील बाजुच्या खिडकीची ला कडी फ्रेम आतील लोखंडी ग्रिल तोडुन आत प्रवेश करून कॉऊंटरवर ठेवलेली व गोडाऊन मधिल बिअर व विदेशी दारू च्या १० पेटया किंमत ७६७०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरानी चोरून नेल्याची तक्रार बार मालक रमेश कुल्लरकर रा. कामठी यांच्या तक्ररीने पोस्टे कन्हान पो लीसानी गुन्हा नोंद करून चोराचा शोध घेत आरोपी प्रदीप उर्फ आर्या दिपक तायवाडे वय २२ वर्ष रा. विवेकानंद नगर कन्हान व दोन विधी संघर्षग्रस्त बालकां ना ताब्यात घेऊन चोरी केलेल्या पैकी टुबर्ग कंपनीची एक बिअर पेटी किमत दोन हजार रू व ओ सी ब्लु कंपनीची १८० एम एल भरलेल्या ४८ निपाची पेटी किंमत सात हजार रूपये अशा एकुण नऊ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करू न आरोपी प्रदीप तायवाडे यांस कन्हान पोलीसानी कलम ४५४, ४५७, ३८० भा दंवि अन्यवे अटक करून दोन विधी संघ र्षग्रस्त बालकांना सुचनापत्र देऊन त्यां च्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
कन्हान पोलीस स्टेशनचे सपोनि सतिश मेश्राम, सपोनि अमितकुमार आत्राम, राजेंद्र पाली, नापोशि राहुल रंगारी, पोशि संजु बरोदिया, मंगेश सोनटक्के, विरेंद्र सिह चौधरी, मुकेश वाघाडे, विशाल शंभ रकर आदीने कार्यवाही केली असुन थाने दार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात सपोनि सतिश मेश्राम पुढील तपास करित आहे.
कन्हान च्या बारची विदेशी दारू चोरी पकडली
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2SpA1nx
via
No comments