रामटेक पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालयात मास्क वितरण
राकापा नागपूर जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांचा स्तुत्य उपक्रम
रामटेक: कोरोना संक्रमणाच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू आहे. या काळात मास्क ही सर्वात आवश्यक गरज झाली असून त्याचा नियमित वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे विविध स्तरावर मास्कवाटप सुरू आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या मार्गदर्शन खाली रामटेक येथील पोलिस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालयात फेस सिल्ड मास्कचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक दिलीप ठाकुर ,सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे रुग्णालय अधिक्षक डा उजगरे सर, राकपा उपाध्यक्ष नागपुर जिल्हा व अध्यक्ष रामटेक शहर डॉ नितिन वेरुळकर व पत्रकार हरिभाऊ अपराजित, महासचिव अवी शेंडे, तालुका अध्यक्ष शुभम डोंडलकर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
रामटेक पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालयात मास्क वितरण
from Nagpur Today : Nagpur News https://ift.tt/2Ac0UFB
via
No comments